आर्थिकउद्योग व व्यवसायकरिअरकृषीमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

मुंजवाड ते तरसाळी फाटा रस्त्यासाठी आठ कोटींचा निधी मंजूर

मुंजवाडचे सरपंच जाधव यांच्या पाठपुराव्याला आमदार दिलीप बोरसे यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

चेतन बागूल (बागलाण प्रतिनिधी)
बागलाण : तालुक्यातील मुंजवाड ते तरसाळी फाटा रस्ता गेल्या काही वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे अनेकदा छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनाही घडत होत्या. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती.

रस्त्यावर मुंजवाड गावाजवळ तीव्र वळणावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही खड्डे बुजवले जात नव्हते. खड्डे चुकविताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत होती. मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरी जाधव यांनी आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जाधव यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार दिलीप बोरसे यांनी या कामासाठी तातडीने सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

आमदार दिलीप बोरसे यांच्या निधीतून मुंजवाड ते तरसाळी फाटा रस्त्याच्या कामाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!