आर्थिककरिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

मराठी भाषा गौरवदिन, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान

कुसुंबा येथील श्रीमती एन.एन.सी. महाविद्यालयातर्फे आयोजन

(नितीन इंगळे : जिल्हा प्रतिनिधी)

धुळे : तालुक्यातील कुसुंबा येथील सोशल अँड कल्चरल असोसिएशन संचिलत श्रीमती. एन. एन. सी. महाविद्यालय येथे मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सो. क. अ. कुसुंबा संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल महादू चौधरी, संस्थेचे संचालक तथा उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. जी. कासार, प्राचार्य डॉ. एस. जी. बाविस्कर, प्रोफेसर डॉ. जितेंद्र गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते.

व्याख्याते डॉ. गिरासे यांनी मराठी भाषेचे महत्व सांगताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भारतातील सर्व विद्यापीठात मराठी विभाग सुरू झाले असून, त्यामुळे मराठी भाषा अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी शासन स्तरावर कोणकोणते आर्थिक फायदे मिळणार आहेत हे सांगितले. दुसरे व्याख्याते डॉ. एम. जी. कासार यांनी विज्ञानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी काय केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चौधरी यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी भाषेत लिहून मराठी भाषेचा गौरव केला आहे. तो ग्रंथ सर्वांनी आवर्जून वाचला पाहिजे आणि वाचनाचे महत्त्व सांगताना वाचाल तर वाचाल असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. एस. जी. बाविस्कर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. बी. बी. गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे डॉ. एच. एम. शेख, डॉ. सिद्धार्थ सोनवणे, प्रा. सौ. एम. एन. चौधरी, प्रा. तृप्ती रामटेके, डॉ.एस. एस. खरात, प्रा. ए. के. गावित, प्रा. बिडगर, कला विभागाचे प्रा. डॉ. वैशाली हजारे, प्रा. मोरे सर, डॉ. सनेर मॅडम, वैष्णव मॅडम व विद्यार्थी, विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.

आपणही गोशाळेसाठी गायींना चारा दान करू शकता… आपण दिलेली मदत नक्कीच योग्य ठिकाणी दान असणार आहे. QR कोडचा वापर करून किंवा आपण स्वतःही भेट द्यावी… आपली मदत म्हणजे सामाजिक कार्याला बळकटी देणारी असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!