कुसुंबा येथे”आत्मनिर्भर युवती अभियान” उपक्रमाचे आयोजन
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी महाविद्यालयाचा उपक्रम

नितीन इंगळे (धुळे प्रतिनिधी) :

धुळे (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुसुंबा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभागअंतर्गत युवती सभा आयोजित “आत्मनिर्भर युवती अभियान” दि 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आले. सदर अभियानाचे उद्घाटन दीपिका अनिल चौधरी ( सचिव सो. क. अ. कुसुबा) तथा अधिसभा सदस्या, विद्यापरिषद सदस्या क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी अनिल महादू चौधरी (अध्यक्ष स. क. अ. कुसुंबा तथा ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष कबचौ उमवी जळगाव ) तसेच, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीएसआय श्रीमती. राजश्री पाटील आझाद नगर पोलीस स्टेशन धुळे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. जी. बाविस्कर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. एन. बावणे, युवती सभा प्रमुख प्रा. तृप्ती रामटेके, हे उपस्थित होते. दिनांक 27 जानेवारी रोजी श्रीमती राजश्री पाटील (पीएसआय धुळे) यांचे सायबर* *क्राईमया विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

सोशल मीडियाचा वापर व वाढणारी गुन्हेगारी या विषयावर मार्गदर्शन केले. ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, इंटरनेटचा वापर करून गुन्हेगार सायबर गुन्हे करत असतात. हॅकिंग फिशिंग मालवेअर, डेटा चोरी ऑनलाईन फसवणूक आणि लैंगिक शोषण यांचा समावेश सायबर गुन्हेगारी मध्ये होतो. एखादी सरकारी सिस्टीम हॅक करणे यासारखे गुन्हे घडतात. युवतींनी आपली संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नये. त्यांच्या फोटोंचा वापर करून बनावट प्रोफाइल तयार केली जाते व त्यांना ब्लॅकमेल केले जाते. यासाठी ऑनलाइन पद्धतीने कोणतेही काम करताना सांभाळून करावे.असे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

दि.28 जानेवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुसुंबा येथे भेट देण्यात आली. यावेळी बँकेतील कर्मचारी वानखेडे सर यांनी विद्यार्थिनींना,”बँकिंग क्षेत्रात निर्माण होणारी नवनवीन तंत्रज्ञान, तसेच निर्माण होणारी आव्हाने, या विषयी मार्गदर्शन केले. बँकेच्या कामकाजाविषयी विद्यार्थिनींना सखोल ज्ञान दिले. बँकिंग क्षेत्रात निर्माण होणारे विविध जॉब त्यासाठी लागणारे क्वालिफिकेशन याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सुविधांविषयी माहिती देण्यात आली. शासनाच्या विविध स्कीम, कर्ज, सोने तारण योजना, सोलर सिस्टिम योजना, गृह कर्ज, व्हेईकल लोन यासारख्या राबवण्यात येणाऱ्या विविध स्कीमची ओळख करून दिली. दिनांक 29 जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबा येथे भेट दिली. वैद्यकीय अधिकारी सूर्यवंशी यांनी सिकलसेल ऍनिमिया व युवतींनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच, रक्तगट व हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. दि. 30 जानेवारी रोजी प्रा. डॉ. विलास चव्हाण यांचे,” *स्वयंरोजगाराच्या* विविध संधी” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. आजच्या युवतीने नोकरीच्या मागे न लागता स्वतःच बिझनेस करावा. स्टार्टअप स्थापन करावे. स्वयंरोजगारामुळे युवती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल. स्वतःच्या पायावर उभी असेल व इतरांनाही आधार देणारी ठरेल. स्वयंरोजगार ही पुढील काळाची गरज आहे. रोजगार निर्मितीसाठी लागणारे विविध स्किल याविषयी तसेच, शासनाकडून मिळणाऱ्या विविध स्कीम याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. दि. 31 जानेवारी रोजी प्रा. डॉ. साजिदा शेख यांचे आजची युवती व कायदा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिलांसाठी असणारे विविध कलम यांची माहिती दिली तसेच, समाजात वावरताना युवतीने आत्मनिर्भर असावे असे सुचित केले.
दि. 2 फेब्रुवारी रोजी आत्मनिर्भर युवती अभियानाचा समारोप करण्यात आला. दीपिका अनिल चौधरी (अधि सभा सदस्या व विद्या परिषद सदस्या) यांच्या हस्ते समारोप करण्यात आला. यावेळी अनिल महादू चौधरी ( अध्यक्ष स.क.अ. कुसुंबा तथा अभ्यास मंडळ अध्यक्ष ग्रंथालय व माहिती शास्त्र कब चौ उमवी जळगाव)हे अध्यक्षस्थानी होते. तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. जी. बाविस्कर हेही उपस्थित होते.
समारोपप्रसंगी दीपिका चौधरी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. “आजची युवती ही उद्याची पिढी घडवणारी आहे. समाज परिवर्तन करणारी आहे. आत्मनिर्भर युवती म्हणजे सक्षमीकरणच होय. आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थिनींनी स्वतःला अपडेट ठेवावे. काळा सोबत चालावे. तंत्रज्ञान आत्मसात करावे व त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. स्वतःला सुरक्षित ठेवावे. समाजात घडणाऱ्या गोष्टींकडे जागृत नागरिक म्हणून पाहावे. असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात अनिल चौधरी यांनी “या सहा दिवसीय व्याख्यानमालेचा विद्यार्थिनींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार. विद्यापीठामार्फत राबवण्यात येणाऱ्या या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते. त्या अधिक सक्षम पणे आत्मनिर्भर पणे समाजात वावरू शकतात. सर्व व्याख्यानांचा विद्यार्थिनींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार. असे मार्गदर्शन केले.
समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य एस. जी. बाविस्कर यांनी केले तर युतीसभाप्रमुख तृप्ती रामटेके यांनी सूत्रसंचालन केले व विद्यार्थिनी कल्याणी देसले यांनी आभार मानले. आत्म निर्भर युवती या अभियानासाठी महाविद्यालयातील ६० विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. सहा दिवस उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या अभियानासाठी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.



