आरोग्यआर्थिककरिअरमहाराष्ट्रमहिलाविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

मुलींच्या सर्वांगीण विकासात आईची भूमिका महत्वाची – डॉ.सुप्रिया मालसाने

नाशिकच्या मा.रा.सारडा कन्याशाळेत आयोजित माता मेळावा

नाशिक (प्रतिनिधी) : पालक म्हणून आपली जबाबदारी पेलतांना पाल्यांशी कसा संवाद ठेवावा? त्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य कसे सांभाळावे? यासाठी आईची भूमिका फार महत्वाची असते, असे प्रतिपादन मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक डॉ. सुप्रिया मालसाने पाटील यांनी मा. रा. सारडा कन्याशाळेत आयोजित माता मेळावाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केले.

त्यापुढे म्हणाल्या की, स्वतः आपण कसे वागतो? याचे अनुकरण मुल करतात. म्हणून पाल्यांची चांगला संवाद ठेवा व मैत्रीचे नाते दृढ करा. आहार कसा बनवावा तर् षडरसात्मक आहार, त्यात गोड, तिखट, खारट, तुरट, आंबट, कडू यांचा समावेश असावा. आजच्या धावपळीच्या जीवनात व्यायामाची फार गरज असून योगासने, सूर्यनमस्कार, दीर्घ श्वसन् करावे. दैनंदिन जीवनात पाल्यांचे संगोपन करतांना स्वतःचे आरोग्यकडे लक्ष देणेही गरजेचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर होत्या. त्यांनीही पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. यानिमित्ताने उपस्थित मातांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका मनीषा देशपांडे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, शालेय समिती सदस्य मंगला निकम, मोहिनी तुरेकर, वर्षा मोरोणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका अहिरे यांनी तर आभार शिल्पा पिंगळे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!