करिअरशहरशैक्षणिक

स्वामी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जी पॅट 2025 परीक्षेत यश

अभोणा : कादंबरी संजय राजभोग, गौरव उल्हास यांचे होतेय अभिनंदन


भरत पाटील (कळवण शहर वार्ताहर)
कळवण : तालुक्यातील अभोणा येथील बहुउद्देशाय सामाजिक, ग्रामीण आणि शैक्षणिक संस्था, विंचुरे संचलित स्वामी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या जी पॅट 2025 या परीक्षेत यश संपादन केले.

स्वामी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील कादंबरी संजय राजभोग, गौरव उल्हास या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या यशामुळे विद्यार्थ्यांना शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात पदवीधर पदवी शिक्षणासाठी प्रवेशानंतर महिना १२,४०० स्टायपेंट मिळतो. जी पेट परीक्षेत पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीधर पदवी शिक्षणानंतर पीएचडीसाठी पात्रता परीक्षा देण्याची आवश्यकता नाही.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड, सचिव संगीता गायकवाड, विश्वस्त तेजस गायकवाड, विश्वस्त कोमल गायकवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौरभ अग्रवाल, किरण पाटील यांनी सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!