सतत शिकून भविष्याला सामोरे जा : मनोहर गाडगीळ
मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिर शाळेचा 80वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ



नाशिक- शाळेने केलेले संस्कार हे नेहमीच चिरकाल टिकणारे असतात. शालेय शिक्षण परिणामकारक असते.म्हणजे चांगले शिक्षण भविष्य घडविते म्हणून सतत शिकून भविष्याला सामोरे जा असे प्रतिपादन एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिर शाळेच्या 80व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात व्हिजेटीआय मुंबई येथील निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी प्रमुख मनोहर गाडगीळ यांनी केले.

ते पुढे म्हणाले की मुलींनी सक्षम राहीले पाहीजे अभ्यास करताना विषय समजून घ्या.बुद्धी तल्लख करा.आज तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रात क्रांती झाली आहे.एआय आले त्याचा वापर चांगल्या कामासाठी करा.अभ्यासाबरोबर व्यायाम, प्राणायाम,योगासने यांचा सराव करुन बुद्धीला धार लावा. नवीन गोष्टी शिकताना बदलांना सामोरे जा.स्पर्धात्मक जगात आव्हाने अनेक आहेत त्यांना सामोरे जाऊन स्वतःची प्रगती करा.असे सांगून बक्षिसपात्र विद्यार्थिनींचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.दुसऱ्या अतिथी प्रसिद्ध शेतीतज्ञ आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी अंजली दिक्षित यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करून भविष्यात लोकल टू ग्लोबल या आधुनिक शेती तंत्रज्ञानचा उपयोग करता येतो त्याचा फायदा घ्यावा असे सांगितले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर यांनी मार्गदर्शन करताना तुम्ही सर्वांनी जिद्द व चिकाटी ठेवा त्यांचा आदर्श घ्या.आपले आवडीचे क्षेत्र निवडा.बक्षीसपात्र मुलींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी मंडळ सदस्या रंजना परदेशी, मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, उपमुख्याध्यापिका मनीषा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण, माजी शिक्षिका सुनीता गायधनी, पर्यवेक्षिका मृण्मयी खरवंडीकर, पाशिसंघ उपाध्यक्षा पल्लवी तिडके, शालेय शालेय समिती सदस्या मंगला निकम, गीतांजली वैष्णव, मोहिनी तुरेकर,शालेय पंतप्रधान श्रावणी नरोडे, प्रशांत तिडके आदी उपस्थित होते. यानंतर मान्यवरांचे हस्ते इ.५वी ते १०वी विषयात विशेष प्रविण्य प्राप्त १०६ विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देवून गौरव करण्यात आला.

सुरुवात दिपप्रज्वलन- सरस्वतीपूजनाने झाली.ओंकार वैरागकर,नीता खैरनार व गीतमंच यांनी स्वागतगीत सादर केले. मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनी स्वागत प्रास्ताविक् केले. शाळेचा वार्षिक अहवाल शालेय पंतप्रधान कु.श्रावणी नरोडे हिने सादर केला.बक्षिस यादीचे वाचन दयावंती मते, कल्याणी कुलकर्णी, स्वाती जोशी, बबिता नागभिडकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय विवेक पाटील यांनी करून दिला. सुत्रसंचालन स्नेहल आपटे तर आभार पर्यवेक्षिका मृण्मयी खरवंडीकर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थिनी,पालक, शिक्षक-शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



