करिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

श्रीमती एन.एन.सी. महाविद्यालय कुसुंबा : पुरुष संघ प्रथम क्रमांकाने विजयी

धुळे विभागीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा

नितीन इंगळे (विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी, धुळे)

धुळे (प्रतिनिधी) : धुळे विभागीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर येथे नुकत्याच संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत श्रीमती एन. एन. सी. महाविद्यालय कुसुंबा येथील पुरुष संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला. विजेता संघाचा सत्कार प्रा. डॉ. अनिल महादू चौधरी (अध्यक्ष सो. क. अ. कुसुंबा), प्रा. डॉ. दिपीका अनिल चौधरी (सचिव सो. क. अ. कुसुंबा, अधिसभा व विद्यापरिषद सदस्या, कबचौउमवि जळगाव), डॉ. एम. जी. कासार (उपप्राचार्य व सदस्य सो. क. अ. कुसुंबा) प्राचार्य डॉ. सुनिल बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आला.
विजेता संघातील खेळाडू
1.ज्ञानेश्वर मधुकर शिंदे (SYBCom),2.विष्णूबाळा श्याम नेरकर (FYBSc Computer), 3.दर्शन भरत खैरनार (SYBSc), 4.हितेश माधव पगारे (FYBSc), 5.लोकेश भटू सोनार (TYBCom)
आगामी स्पर्धेसाठी ज्ञानेश्वर शिंदे आणि विष्णूबाळा नेरकर यांची धुळे विभागीय बुद्धिबळ संघात निवड झाली. दर्शन खैरनार याची प्रतीक्षा यादीत निवड झाली. सर्व विजयी खेळाडूंचे संचालक मंडळ आणि महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!