Uncategorized

[10/03, 1:48 pm] Tt Chayatai Sawant: * ज्ञानयात्री उपक्रम अंतर्गत काल दिनांक 7 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहणे शाळेची शैक्षणिक सहल व अभ्यास दौरा संपन्न झाला. या शैक्षणिक सहलीच्या अभ्यास दौऱ्यात काल जिल्हा परिषद नाशिक येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षण विभागाच्या कार्यलयाची ओळख देवून तेथील अधिकाऱ्यांची भेट घडवून आणली. काल ऑफिसला सुट्टी असल्या कारणाने मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय पवार साहेब यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही तरीही साहेबांनी विद्यार्थ्यांशी फोनवर संवाद साधून त्यांच्याशी हितगुज साधले. व ज्ञान यात्री उपक्रमात बद्दल विद्यार्थ्यांचे मनोगत जाणून घेतले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वरिष्ठ सहाय्यक विनोद जगताप सर यांची भेट घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांना देवळाली कॅम्प येथील म्युझियम तसेच यशवंतराव चव्हाण तारांगण फाळके स्मारक बुद्ध विहार सिटी सेंटर मॉल चांदवड येथील रंग महाल इच्छापूर्ती गणपती मंदिर व रेणुका देवी मंदिर दर्शन घडवून आणले अतिशय आनंद पूर्ण वातावरणात सहल संपन्न झाली. या सहलीसाठी मार्गदर्शन व योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहाणे टीमकडून खूप खूप धन्यवाद.
[10/03, 4:12 pm] Tt Chayatai Sawant: सहलीला मालेगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी साहेब श्री निलेश पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी श्री साहेबराव निकम साहेब तसेच शाळेचे ग्रेडपात्र मुख्याध्यापक श्री पवार सर व शाळेचे शिक्षक श्रीमती छाया पाटील श्री धीरज देवरे श्री वैभव वाघ सर व श्रीमती संगीता पाटील यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!