करिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त उद्या विचार- जागर

नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे परिसंवाद, काव्यसंमेलन व साहित्यिक कार्यक्रम

नाशिक : ज्ञान, समता आणि प्रबोधनाच्या अमर ज्योतीने महाराष्ट्रासह संपुर्ण भारत देशाला दिशा देणारे क्रांतिकारी समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या २८ नोव्हेंबरला विचार-जागर तर्फे विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्यिक कार्यक्रमात परिसंवाद, कवीसंमेलन व इतर साहित्यिक कार्यक्रम होणार आहेत.

शुक्रवारी दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माळी समाज सेवा समितीचे व हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या हस्ते होईल. तसेच प्रसंगी कॉ. राजू देसले, अशोक होळकर प्रमुख पाहुणे उपस्थित असतील.

दुपारच्या पहिल्या सत्रात “महात्मा जोतिराव फुले आणि आजचा भारत” या विषयावर होणार्‍या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व कादवा शिवार प्रतिष्ठानचे प्रमुख विजयकुमार मिठे असणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक सप्‍तर्षी माळी, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, शेतकरी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ढेपले, प्रसिद्ध साहित्यिका प्रा. डॉ. सिल्केशा आहिरे असणार आहेत. अक्षरबंधचे संपादक व आजीचे पुस्तकांचे हॉटेलचे संचालक प्रवीण जोंधळे संवादक म्हणुन असतील. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित निमंत्रित कवींचे काव्य संमेलन होणार आहे. सुप्रसिद्ध विडंबनकार कवी संजय आहेर हे या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.

काव्यसंमेलनास अनेक नामवंत कवी सहभागी होणार आहेत. त्यात प्रशांत केंदळे, विठ्ठलतात्या संधान, तुकाराम ढिकले, शुभांगी पाटील, गोरख पालवे, रविकांत शार्दुल, नंदकिशोर ठोंबरे, विशाल टर्ले, सामी बागूल, रतन हिरे, राजेश जाधव, तेजस्विनी जाधव,सुनीता वाळूंज, पंकज गवळी, वैजयंती सिन्नरकर, अभिलाषा दायमा, काजल आहेर-शेलार, नलिनी बागूल, राजेंद्र जाधव या कवींचा समावेश आहे. कार्यक्रमास सर्व साहित्यिक, फुले प्रेमी, श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सप्‍तर्षी माळी, बाळासाहेब गिरी व इतर आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!