आरोग्यकरिअरज्येष्ठ नागरिक वृत्तदेश-विदेशमहाराष्ट्रविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

वृद्धाश्रम नव्हे रिटायरमेंट होम…

नाशिक शहराजवळ वृद्धांना कायमस्वरूपी राहण्यासाठी सुंदर ठिकाण - विजयकुमार इंगळे

वृद्धाश्रम असावेत की नसावेत… या संदर्भात अनेक मतप्रवाह असू शकतात. मात्र समाजातील बदलत्या जीवनशैलीचा विचार केला तर जनरेशन गॅपचाही विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व विचारांच्या प्रवाहात वृद्धाश्रम ही काळाची गरज बनते आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. येणा-या काळात समाजाची गरज म्हणूनही त्याचा विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र यातही वृद्धाश्रम या शब्दाचा प्रयोग न करता आनंदाश्रम किंवा रिटायरमेंट होम असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

कुटुंबासमोरील आव्हानांचे विचार केला तर कुटुंबातील दोघांनी जॉब करणेही महत्त्वाचे आहे. कुटुंबातील सदस्यांची वाढती संख्या आणि महागाईचा विचार करता पती-पत्नीने जॉब करणे गरजेचे आहे. मात्र या रोजच्या धावपळीत कुटुंबातील ज्येष्ठांकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. या सर्व विषयांचा विचार केला तर आनंदाश्रम (रिटायरमेंट होम) ही येणा-या काळात आवश्यक आहेत. मात्र वृद्धाश्रमांचा विचार करताना आपल्या माणसांची उत्तम देखभाल करण्यासाठी पैसे भरून वृद्धाश्रमात ठेवले तर उत्तम काळजी घेतली जाते. आपण जितकी काळजी आपल्या घरी घेवू शकत नाही, तितकी काळजी तिथे घेतली जाते. त्यामुळे कुटुंबातील पती पत्नी किंवा अन्य सदस्य निश्चिंतपणे जॉब करू शकतात.

समाजासमोरील, कुटुंबासमोरील येणा-या काळातील आव्हानांचा विचार केला तर वृद्धाश्रमे ही काळाची गरज बनते आहे. आपल्या कुटुंबातील वृद्धांची देखभाल करण्यासाठी अनेक ठिकाणी केअर टेकरची नेमणूक आपण करतो. मात्र केअर टेकरची नेमणूक करून केअर टेकर असलेल्या व्यक्तीला आपल्याच कुटुंबाचा भाग म्हणून वावरण्याची मुभा देत असतो. मात्र अशा वेळी अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अनेकदा आपण जॉबला गेल्यानंतर कुटुंबात असलेल्या वृद्ध व्यक्तीला उत्तम सकारात्मक वातावरण राहू शकते का… याचाही प्रकर्षाने विचार आपण केला पाहिजे. मात्र याला पर्याय म्हणून कुटुंबातील वृद्धांसाठी उत्तम सकारात्मक वातावरणात ठेवून त्यांना आनंदी बघायचे असेल तर नक्कीच वृद्धाश्रमाचा विचार करायला हवा. याच आवर्जून उल्लेख करता येईल नाशिकमधील गंगापूर गावाच्या पुढे असलेल्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबने सुरू केलेल्या शिवसुमन आनंदाश्रमचा… निसर्गाच्या सानिध्यात शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शांत वातावरणात सुरू केलेल्या या ठिकाणाचा…

इतरांचा विचार कशासाठी…

आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींना वृद्धाश्रमात ठेवले तर समाज काय म्हणेल.. लोक काय म्हणतील… यासाठी अनेकदा अशा कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे राहतात. मात्र कुटुंबातील एकंदरीत वातावरण पाहता आपण इतरांचा विचार न करता आपल्या कुटुंबातील वृद्धांना आनंदी वातावरणात त्यांची देखभाल करण्यासाठी चांगली व्यवस्था उभी करायची असेल तर नक्कीच अशा ठिकाणांचा विचार करणे, ही काळाजी गरज आहे.

कुटुंबातील मुलं मुली सज्ञान असतील तर वृद्धाश्रमाचा विचार करण्यास काहीच हरकत नाही. ज्यांना आई वडील यांचे कडे स्वतः लक्ष देणे जमतं नाही, त्यांची काळजी करणारं घरात कुणी नाही, अशा व्यक्तींनी वृद्धाश्रमात पैसा भरून उत्तम सोय करावी. अगदी त्यांना चांगले जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी…

हेही विचारात घ्या…

हल्लीची पिढी नोकरी किंवा व्यवसायानिमित्त फिरत असते आणि पालकांना मुलांनी असलेल्या संधी सोडून आपल्याजवळ राहण्यासाठी मुद्दाम तडजोड करावी असे वाटत नाही. तसेच जसे आपण वयस्कर होत जातो तशी आपली दुसऱ्या गावात जाऊन नव्याने जुळवून घेण्याची क्षमता कमी कमी होत जाते. त्यापेक्षा आपल्या ओळखीच्या परिसरात राहून निवृत्तीनंतरचा काळ व्यतीत करावा असे वाटल्यास वावगे नाही. मग यात एकच उपाय उरतो, तो म्हणजे वृद्धांनी स्वतःची सोय करण्याची मानसिक तयारी करणे.

चांगल्या वृद्धाश्रमात अतिशय आनंदाने राहणारे वृद्ध माहीत आहेत. तिथे उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधा आणि इतर समवयस्क, समविचारी लोकांचा सहवास त्यांना आवडतो. जशा या सेवा विस्तारत जातील, तशा या संस्था संख्येने वाढतील व त्याबद्दलचे पूर्वग्रह दूर होतील असे वाटते.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. एकाच घरात २ ते ३ कुटुंबे एकत्र नांदत असत. त्यामुळे एखाद्या जोडप्याचा मुलगा अथवा मुलगी (कोणत्याही कारणाने) शहराबाहेर गेले, तर इतर माणसे त्यांची काळजी घेऊ शकत होती. आजकाल ज्या शहरात जन्म झाला , त्याच शहरात शिक्षण पूर्ण करणे व त्याच शहरात जीवन व्यतित करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुलं देशात, परदेशात शिकायला व नोकरीला जावीत ह्यासाठी मुलेच नाही तर पालकसुद्धा प्रयत्न करत राहतात. अशा वेळेस वृद्धापकाळाची सोय म्हणून वाढते वय, एकटेपणा आणि परावलंबित्व ह्यावर उपाय म्हणून वृद्धाश्रम हा पर्याय अतिशय मोलाचा आहे. तात्त्विकदृष्ट्या तरी चांगला वाटतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता वृद्धाश्रम हा चांगला पर्याय आहे.

अनेक मोठ्या शहरांमध्ये आजकाल वृद्धाश्रमांच्या जागी retirment होम ही नवीन संकल्पना उदयाला आलीय. वृद्धापकाळात येणा-या अडचणी लक्षात घेता असे पर्याय नक्कीच मोलाचे ठरतात. केअर टेकरच्या भरवशावर किती दिवस राहू शकतो. यात एक उदाहरण नक्कीच देता येईल. नाशिकच्या एका उपनगरातील ज्येष्ठ नागरिक आजींनी गेली अनेक वर्षे ओळखीचा रिक्षावाला व स्वयंपाकासाठी नेमलेल्या बाईंनी त्यांच्या एकटेपणाचा फायदा उठवत त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना सर्वच बाजूने लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक वृद्धाश्रमांना भेटी देत स्वतःची व्यवस्था व्हावी, म्हणून प्रयत्न केला. मात्र अनेक वर्षे आपल्याभोवती मधमाशीसारख्या चिकटलेल्या रिक्षावाला व स्वयंपाकी बाईने कुठेही जावू दिले नाही. कारण पुढे आले तर… सोने की अंडे देनेवाली मुर्गी… दोघांनी मिळून या आजींच्या एकटेपणाचा फायदा घेतानाच वृद्धाश्रमात गेल्या तर आपली कमाई बंद होईल… या स्वार्थापोटी त्यांची वेळोवेळी फसवणूक केली… या सर्व बाबींचा विचार करता वृद्धाश्रम (आनंदाश्रम) ही समाजाची नक्कीच येणा-या काळात गरज आहे. गरज आहे फक्त मानसिकता बदलण्याची… वृद्धाश्रमातील आनंदी वातावरणात आयुष्याला आनंद देण्याची… मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदी करण्यासाठी नक्कीच शिवसुमन आनंदाश्रमासारखे पर्याय समाजात उभे राहिले आहेत...

विजयकुमार इंगळे

संस्थापक अध्यक्ष, जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब, मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाच्या पुढे, नाशिक – ४२२ २२२. संपर्क – ८८८८९४७९७९, ८८८८८९७८५७.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!