वृद्धांसाठी उभारलेला नाशिकमधील प्रकल्प भविष्यातील समाजाची गरज
प्रसिद्ध सर्जन डाॅ. प्रदीप साळी यांची जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबला सदिच्छा भेट



नाशिक (प्रतिनिधी) – वृद्धांच्या आयुुष्यात येणाऱया काळातील गरज लक्षात घेवून विरंगुळा केंद्र ही गरजेची आहे. हीच गरज ओळखून नाशिकमध्ये सुरू झालेला प्रकल्प नक्कीच राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प ठरू शकेल, असे मत प्रसिद्ध सर्जन डाॅ. प्रदीप साळी यांनी व्यक्त केले. नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबला नुकतीच सर्जन डाॅ. प्रदीप साळी यांनी सपत्नीक सदिच्छा भेट उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांनी उपक्रम सुरू करण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
वृद्धांना भेडसावणाऱया अडचणी, वृद्धांची विविध कामांमध्ये सहभागी होण्याची तयारी, तसेच त्यांच्या मेंदूला चालना मिळेल, वृद्धांच्या अंगभूत कलांच्या विकासासाठी सिनिअर सिटीझन क्लबसारख्या व्यासपीठाची उपलब्धता, वृद्धांना कलागुणांच्या सादरीकरणातून मिळणारे समाधान, आत्मविश्वासामध्ये होणारी वाढ यासंदर्भात डाॅ. प्रदीप साळी यांनी सविस्तर चर्चा केली. नाशिकसारख्या स्मार्ट सिटीमध्ये भविष्यातील गरज ओळखून जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबची स्थापना करण्यात आली. शहरांची होणारी वाढ, नव्या पिढीत आणि वृद्धांच्या पिढीत असलेला मोठा समन्वयाचा अभाव यामुळे अनेकदा वृद्धांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. परिणामी डिमेन्शिया, अल्झायमर्स, पार्किन्सन यांसारखे आजारांचे प्रमाणही वृद्धांमध्ये वाढते आहे. कुटुंबात सर्व सोयी असूनही केवळ संवादाचा अभाव असल्याने वृद्धांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते आहे. येणा-या काळात नाशिकमध्ये सुरू झालेल्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबसारख्या उपक्रमांची समाजामध्ये मोठी गरज असणार आहे. हीच गरज ओळखून नाशिकमध्ये हा पथदर्शी उपक्रम केवळ आणि केवळ वृद्धांसाठी उभा राहिलाय.
निसर्गाच्या सानिध्यात शांततेचं ठिकाण…
नाशिक शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबमध्ये उभा राहिलेला प्रकल्प नक्कीच नाशिकसह राज्यातील वृद्धांसाठी मोलाचा आधार ठरणार आहे. बसस्थानक, विमानतळ, रेल्वेस्थानक, दळणवळणाची साधने उपलब्ध असलेल्या गंगापूर गावाजवळ एक एकर जागेवर उभा राहिलेला प्रकल्प नक्कीच शांततेचं ठिकाण बनतो आहे. ज्येष्ठांसाठी सुरू झालेल्या या प्रकल्पात भव्य वाचनालयाची उभारणी करण्यात आली असून अनेक नामवंत लेखक, कवींची पुस्तके वृद्धांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय, विविध मनोरंजनाची साधने, जसे की, चेस, कॅरम, पत्ते, विवध गेम्स, कराओके, प्रशस्त हाॅल, सिनेमा थिएटर, दैनिके… बैठकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी खुर्च्यांची तसेच सोफ्यांची व्यवस्था… पटांगणात टेबल तसेच खुर्च्यांची उपलब्धता… खाटांची व्यवस्था…

कायमस्वरूपी वृद्धांना राहण्यासाठी आगळी वेगळी व्यवस्था
जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबतर्फे वृद्धांच्या वाढत्या वयाचा विचार करून या ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. शाकाहारी भोजन, चहा, आरोग्यवर्धक नाश्त्याची व्यवस्था, फळांची उपलब्धता… याशिवाय वैद्यकीय व्यवस्थेवर या ठिकाणी भर देण्यात आला आहे. वृद्धांच्या वाढत्या वयातील गरज लक्षात घेवून डाॅक्टर्स, नर्सेस, केअर टेकरची व्यवस्था इथे आहे. प्रत्येक रुमसाठी टीव्ही, रेडिओची व्यवस्था… वैयक्तिक लक्ष देण्यावर असलेला भर… स्वतः प्रकल्पाचे अध्यक्ष या ठिकाणी नियमितपणे उपस्थित असतात. या प्रकल्पाला कुठेही वृद्धाश्रमाचे स्वरूप येवू दिलेले नाही. हीच गरज ओळखून जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबमध्ये निवासव्यवस्थेला शिवसुमन आनंदाश्रम असे नाव देण्यात आले आहे.

आपले सत्पात्री दान नक्कीच समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगात येणार
मावळतीकडे झुकलेलं ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य हे म्हातारपण नसून विधात्यानं माणसाला बहाल केलेलं दुसरं बालपण होय… कुटुंबातील वृद्धांचा मावळतीकडे जाणारा प्रवास मनुष्याचा हा नेहमी समाधानी आणि आनंदपूर्ण होण्यासाठी जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबतर्फे प्रयत्न केले जाताहेत, ही एक जमेची बाजू आहे. सामाजिक बांधिलकी जपत सुरू झालेल्या वृद्धांच्या वाढत्या वयाचा विचार करून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाच्या निमित्ताने नक्कीच एक भक्कम आधार वृद्धांना जगण्याची वाट भक्कम करतोय. समाजामध्ये अनेकजण सामाजिक बांधिलकी मानून आपले सत्पात्री दान देत असतात. जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबच्या निमित्ताने उभ्या राहिलेल्या या प्रकल्पासाठी आपण आपले योगदान नक्कीच पुढील क्यूआर कोडवर देवू शकतात. केवळ आणि केवळ मायेचा आधार देणा-या या प्रकल्पासाठी शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीच्या खात्यावर देवू शकतात.








