उडाणे (धुळे) वाचनालयात अहिल्यादेवी पुण्यतिथी साजरी

(नितीन इंगळे : विकासाची वाट प्रतिनिधी धुळे)


धुळे : तालुक्यातील उडाणे येथील शासनमान्यता असलेले राजमाता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी व वाचक यांनी अभिवादन केले . यावेळी प्रतिमा पुजन वाचनालयाचे अध्यक्ष रोहिदास हाके यांनी केले तर प्रमुख उपस्थित जेष्ट वाचक दगा शिंदे . मच्छिंद्र वाघ, दयाराम शिदे, सदाशिव हाके, रघुनाथ शिंदे, जगन्नाथ शिंदे, किशोर हाके, वकील हालोर. जिभाऊ मासुळे आदी उपस्थित होते. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी वाचनालयाचे सचिव सदाशिव हाके व उपाध्यक्ष बापू शिंदे तसेच माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीनी यांनी मनोगत व्यक्त केले.

शेवटी अध्यक्षीय भाषणात रोहिदास हाके यांनी राजमाता अहिल्या देवी होळकर यांचा कार्याचा आढावा व आपल्या वाचनालयाला या मातेचे नाव दिले त्यांनी भारतात केलेले कार्य आजही शासन त्याप्रमाणे करीत आहेत मंदिरे पाणी आढवा पूर रस्ते त्यावेळी त्यांनी केले होते . आपल्या वाचनाल्यात मुलांना आभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुरु केली आहे. वाचनालयामुळे जेष्ट मंडळीत व विद्यार्थी वर्गात वाचनाची गोडी निर्माण झाली आहे. शेवटी आभार व सुत्रसंचालन वाचनालयाचे संचालक श्री किशोर पाटील यांनी केले कार्यक्रमासाठी विद्यार्थी वाचक उपस्थित होते.



