मानवतेचा दीपस्तंभ आचार्य श्री देवनंदीजी महामुनीश्री
सतीश वसंतीलाल जैन (खानदेश जैन समाज प्रसिद्धप्रमुख)


दिगंबर पंथाचे महामुनीश्री युवातपस्वी, ज्ञानयोगी, प्रज्ञाश्रमण प.पु. श्री आचार्य श्री देवनंदीजी महाराज सह संघाचे कुसुंबा जवळील (८० कि.मी) णमोकार तीर्थक्षेत्र येथे यावर्षीचा चातुर्मास सानंद संपन्न होत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विशेष सकल जैन व जैनेतरांना त्यांचे मननीय विचार ऐकण्याची संधी लाभणार आहे. १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या जन्मदिनानिमित्त यांचा लेखाचा मुनिश्रीच्या विषयी थोडक्यात परिचय करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच…
महापुरुषांचा गौरव करण्याची प्रथा भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मग आजचे युग तरी याला अपवाद कसे ठरेल? मुळातच भारतीय संतांची भूमी आजही अनेक ऋषीमुनी आहेत. ख्याती प्राप्त दिगंबर मुनी काही कमी नाहीत .त्यामध्ये प.पु. आचार्य देवानंदीजी मुनीश्रींचे स्थान मुनी समूहांच्या केंद्रस्थानीआहे .भारतीय संस्कृतीवर साधुसंतांचा मोठा प्रभाव आहे .यात कोणाची दुमत होऊ नये.
भारताच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, घडामोडींवर या महापुरुषांचा मोठा प्रभाव आहे. समाज परिवर्तनाचे सत्कार्य तेच करतात. विश्वबंधुत्वाच्या भावनेला बळकट करण्यामध्ये सारस्वताचार्य प्रज्ञाश्रमण देवनांदजी महाराजांना सध्याच्या युगातले अग्रगण्य संत म्हणावे लागेल .अनेक सामाजिक समस्यांची त्यांना सखोल जाण आहे. दुःख, दारिद्र, निराशा, अनैतिकता मोह आणि क्षाेभ, अज्ञान आणि अविवेक यांनी गांजलेल्या मरगळलेल्या समाजात नव्या सुंदर जीवनाची महत्त्वकांक्षा निर्माण करण्याचे कार्य मुनिश्री अखंडपणे करत आहेत.

आम्ही देवनंदीजी होणार नाही .तितकी आमच्यात शक्ती नाही. पण देवनंदीजी नावाची व्यक्ती आणि शक्ती ओळखण्याची कुवत आमच्या बुद्धीत एक हळूहळू येत आहे. संत म्हणजे समाज मनाला स्फुरण देणारी एक रचनात्मक शक्ती क्रांती करणारी महाराज ही असंख्य लोकांच्या मानसिकतेला चेतना देणारी मंगल शक्ती आहे.
एखादी महानदी सागराकडे जात असताना तीरावरील सारा प्रदेश हिरवागार करीत जाते, त्याप्रमाणे विद्येची आणि आनंदाची ही महानदी समाज मनाला हरित सुंदर बनवीत आपला प्रवास करीत आहे. तदवत पूजश्री देवानंदजी महाराज महाराष्ट्राला सरस्वती रूपाने ज्ञानार्जन करीत आहे .महाराजांनी आजपर्यंत असंख्य प्रवचन देऊन लक्ष लक्ष जनतेला प्रबाेधीत केलं आहे. सागरावर ज्याप्रमाणे लाईफ लाटा मागून लाटा येतात त्याप्रमाणे मुनिश्रींनी लोकमनात आपल्या आपल्या उदबाेवक प्रवचनांनी विचारांच्या आणि भावनांच्या अगणित लाटा निर्माण केल्या आहेत. मुनीश्रीं देवानंदजी म्हणजे ज्ञानाचा सुविचारच आणि सुसंस्काराच एक क्षेत्र आहे. महाराजांचा प्रत्यक्ष शब्द त्यांच्या अंत:करणाचा गंध आणि पवित्र्य घेऊन जन्माला येतो. त्या शब्दाला आपुलकीचा स्पर्श असतो त्यांची प्रवचन ज्यांना ऐकली त्यांची वैचारिक श्रीमंती तर वाढतेच पण आपल्या आचारात आणि व्यक्तिमत्वात एक सुंदर परिवर्तन घडून येते.

मांगीतुंगीजी येथे झालेल्या प्रवचनाचे प्रत्यक्ष टिपलेले क्षणचित्र खांन्देश पत्रकार सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा यांनी घेतलेल्या ज्ञानवंतांचे सानिध्य किती आणि कस प्रेरक असतं याची साक्ष त्यांच्या सहवासात पटते. राजकीय क्षेत्रातल्या श्रेष्ठ अधिकारी ,आमदार, खासदार व्यक्ती देखील महाराजांचे शब्द किती उत्कंठेने आणि नम्रतेने ऐकतात ते मी पाहिले आहे. कोणत्याही क्षेत्रातल्या श्रेष्ठ व्यक्तीला महाराजांचे मौलिक स्वरूपाचं वाटत जैन धर्मातील उदात्त्त तत्वधारा अखिल मानव कल्याणासाठी कशी उपकारक आहे हे त्यांच्या शब्दातूनच ऐकले पाहिजे
संक्षिप्त जीवनदर्शन:- मुनिश्रींच्या वडिलांचे नाव श्री सि.प्रेमचंद जैन व आईचे नाव श्रीमती. शिलादेवी होते. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील शहागड या गावी १५ऑगस्ट १९६३साली झाला . गृहस्थाश्रमाचे नाव मुलायमचंद्र वयाच्या सोळाव्या वर्षी गृहस्थाश्रमाचा त्याग करून मुनिश्री शाश्वत सुखाकडे वळले. संसार असार पाहून त्यांना वैराग्य झाले. या साधनेत विलीन होऊन प.पु. १०८ गणाधाराचार्य कुंथुसागर जी महाराज यांचे सानिध्य व आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले. दीक्षा ५ फेब्रुवारी १९८१ला श्रवणबेळगाव येथे झाले. आणि दिगंबर मुनिदीक्षा ३१ मार्च १९८२ ला हसन येथे स्वीकारली. त्याप्रसंगी दीक्षागुरु आचार्य कुंथुसागरजी महामुनीश्री होते. प.पु. देवनंदीजीं मुनीश्रींचा भारत भ्रमणात विहार करत असताना ज्या स्थळी पोहोचतील त्या स्थळी यात्रेचे स्वरूप प्राप्त होत होते.

दर्शनासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी (सर्व धर्मीयांची) गर्दी जमत असे. त्यांचे साधे सोप्या सरळ भाषेत प्रवचन श्रवणाने श्रोते मंत्रमुग्ध होत . संयमाचे साधक आणि सागमाचे आणि आगमचे अध्यात्म पाहून गुरुंनी त्यांना ‘प्रज्ञाश्रमण’ ज्ञानयाेगी पदवीने विभूषित केले.
लेखन प्रकाशन:-प.पु. मुनिश्रींनी अविरत परिश्रम करून अनेक ग्रंथांचे लेखन केले. त्यापैकी शांतीसागर महाराजांचे जीवनकृत, मंत्रांची महिमा, पंचकल्याणक महोत्सव एक विश्लेषण, कुंथुशतक आणि ध्यान जागरण, भक्ताम्बर साधनाचे पाच भाग णमोकार विज्ञान, जीवन विज्ञान, तत्त्वविज्ञान, कषायविज्ञान, कर्मविज्ञान , जैन धर्म, सामान्यज्ञान, वास्तूचिंतामणी इत्यादी रचना चिंतन आणि मनन योग्य आहे . सतत साधना, नानाभ्यास ,चिंतन मनन, लेखन ,प्रवचन, तत्वचर्या यात मग्न असलेले मुनिश्री वात्सल्य व करूणेचे प्रमाण आहेत .जैन भक्तांच्या प्रति प्रवाहित करण्याचे जणू ते उगमस्थान आहेत. श्रमण परंपरेच्या प प्रभावनेत व साधूमनांच्या श्रेणीत मुनिश्री श्रद्धांचे पुंज्य आहेत . या भुतलावर रोज हजारो लोक जन्म घेतात पण मोजकी माणसे येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या आदर्शाचा वारसा ठेवुन जात असतात. युगप्रवर्तक देवनंदीजी महामुश्री आपल्या त्यागमय व संयम जीवनाने देशाला सत्य ,अहिंसा व शांतीचा मार्ग दाखवीत शिष्यगणांसह पायी भारत भ्रमण करीत कुसुंबा येथून जवळजवळ ८० कि.मी.अंतरावर णमोकार तीर्थधाम येथे सानंद चातुर्मास संपन्न होत आहे. त्यांच्याच प्रेरणाचे क्षेत्र उदयास आले आज ते वटवृक्षात रूपांतर झाले .या क्षेत्री विविध सुविधा उपलब्ध असून दररोज देश विदेशातून बहुसंख्य भाविकांची उपस्थिती दिसून येते. णमोकार क्षेत्र रोडच्या बाजूलाच असल्यामुळे लांबूनच क्षेत्र दृष्टिपथास येते. पूज्य श्रींच्या तीन विशेषता स्पष्टवक्तेपणा आत्मसाहस व गुणभक्ती हे होत. प.पु.श्री म्हणजे आचार, विचारांचा कृती ,प्रगती, प्रतिमा आणि उदारता यांचा सुंदर सरस व पावन संगम आहे. पूज्यश्री शरीर सुखाने सुडाैल मनाने मृदू, वाणीने विनम्र बुद्धीने विवेकशील हृदयाने भावुक आणि विचारणे उदार आहेत. पूज्यश्रींचे प्रवचन श्रवण करत असताना असे वाटते की ते सारखे चालत राहावे कधीही ते संपू नये .मुनिश्री आपल्याला पाहणं आणि ऐकणं हा नयनोत्सव आणि श्रवणोत्सव आहे. हा उत्सव अखंड अनुभवु द्या इतकीच अपेक्षा. पूजाश्रींच्या जन्मदिनानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम…!




