धार्मिकमहाराष्ट्रशहरसामाजिकसांस्कृतिक

यज्ञसंस्थेसाठी यजुर्वेद उपयुक्त : महंत सुधीर पुजारी

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था, नाशिक येथे महर्षी योगीश्वर याज्ञवल्क्य उत्सव

पंचवटी ( प्रतिनिधी) : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक येथे महर्षी योगीश्वर याज्ञवल्क्य उत्सव उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महंत सुधीर पुजारी हे होते. स्वागत कार्यवाह धनंजय पुजारी यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन,राजन कुलकर्णी यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष ऍड. भानुदास शौचे यांनी केले. तर आभार प्रमोद मुळे यांनी केले.


प्रमुख पाहुणे महंत सुधीर पुजारी यांनी आपले मनोगतात सांगितले की –
द्वापार युग काळात याज्ञवलक्याना सूर्य उपासनेद्वारा शुक्ल यजुर्वेद मंत्र स्वरूपात ज्ञान म्हणून लाभला .
योगिश्र्वर ही पदवी श्रीकृष्ण व याज्ञवलक्य या दोन महान व्यक्तींना प्राप्त झालेली आहे.
यज्ञसंस्थेसाठी यजुर्वेद उपयुक्त आहे
यावेळी कार्यवाह धनंजय पुजारी, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन, उपाध्यक्ष ऍड भानुदास शौचे, श्रीमती मालती कुरुंभट्टी, प्रमोद मुळे, राजन कुलकर्णी, पं. भूषण शुक्ल, सुहास भणगे, पं रवींद्र देव,सतीश जोशी,सी व्ही महाजन, छाया महाजन, राजश्री शौचे, मंजुषा अगस्ते, रत्नप्रभा गर्गे, अनिता कुलकर्णी, ऍड. प्रणिता कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, शर्विल कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, गजानन जाधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!