आरोग्यकरिअरक्रीडाधार्मिकनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

​महाराष्ट्र हास्ययोग संघ, नाशिकतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

मान्यवरांची उपस्थिती : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या घटकांचा सन्मान


पोपटराव देवरे (नाशिक शहर प्रतिनिधी)

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र हास्ययोग संघ, नाशिकच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या जवळपास अर्धशतक (५०) हास्य क्लबांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. हास्ययोगामध्ये योग हा अविभाज्य घटक असल्याने, योग दिन साजरा करणे ही संघाची परंपराच बनली आहे.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन संघाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील कोटगी यांनी केले; तर लक्ष्मीकांत विसावे आणि प्रदीप हिरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

​कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर वैभवी कोटगी यांनी घेतलेल्या जोशपूर्ण व आकर्षक वॉर्म-अप एक्सरसाईजमुळे (व्यायामामुळे) उपस्थितांमध्ये उत्साह आणि चैतन्य संचारले. पुढे सुभाष वाणी आणि गंभीरे सर यांनी योगातील विविध आसनांचा परिचय करून देत त्यांचे महत्त्व पटवून दिले.

​युवा योगशिक्षिका राधिका बडगुजर यांनी संगीताच्या तालावर योग आणि नृत्याची सुंदर सांगड घालत केलेले सादरीकरण या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. विशेषतः दंडस्थितीतील विविध योगासनांचा समावेश असलेल्या त्यांच्या देखण्या प्रस्तुतीने उपस्थितांची मने जिंकली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

​या कार्यक्रमाला माजी नगरसेविका भाग्यश्रीताई ढोमसे तसेच मानवधन सामाजिक संस्थेचे संस्थापक डॉ. प्रकाश कोल्हे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.

​यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश कोठावदे, SCN NEWS चॅनलचे संपादक विजयकुमार इंगळे आणि वृक्षमित्र छबुराव हाडपे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. विविध क्लबचे अध्यक्ष आणि नामांकित व्यक्तींच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला.

योगाचार्य प्रज्ञा पाटील आणि सत्कारार्थी देवाभाऊ वाघमारे व राजेंद्र फड काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

​कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दुर्गानगरी हास्य क्लबच्या हेमलताताई हिरे, बोचरे, कैलास गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यासपीठ आणि संपूर्ण व्यवस्थेची उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. ​तसेच दिलीप शेवाळे, विजय शिरसाठ, वसंत दशपुते, प्रकाश मुसळे, प्रकाश विसावे, किशोर पाटील, रवींद्र बिडवे, संजय सोनवणे व अनिल तुंगार यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आकर्षक बॅनर्स तयार करून ते लावण्याचे काम गणेश बोरसे यांनी प्रभावीपणे पार पाडले.

​कार्यक्रमानंतर अल्पोपहार वितरणाची व्यवस्था अशोक सावकार, भवर सर आणि दुर्गानगरी हास्य क्लबच्या दिनेश बागुल, जगन्नाथ बच्छाव, राजेंद्र साळुंखे, दीपाजकाद्दार, योगिता ठाकरे, मीनल भालेराव यांचे सह संपूर्ण टीमने उत्तमरीत्या सांभाळली.

​सर्व हास्य क्लबचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अँकर पर्सन (सूत्रसंचालक) आणि क्रियाशील सदस्य यांनी उत्तम सहकार्य केले. तसेच इतर सदस्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

​शेवटी आनंदी वातावरणात, विविध गीतांच्या तालावर उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गुरुवंदना सादर केली आणि “योग, हास्य आणि आनंद” यांचा सुंदर संगम अनुभवत कार्यक्रमाची मंगलमय सांगता झाली.

​”योगातून आरोग्य, हास्यातून आनंद आणि सेवेतून समाधान” हा संदेश देणारा महाराष्ट्र हास्ययोग संघ, नाशिकचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला.

8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!