करिअरक्रीडामहाराष्ट्रशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

पेठ येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

प्राचार्य डॉ नरेंद्र पाटील : दादासाहेब बिडकर महाविद्यालय

पेठ : येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालय पेठ येथे राष्ट्रीय क्रीडा दिन तथा मेजर ध्यानचंद ( हॉकी चे जादुगार) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळा तथा कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमात हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन, अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नरेंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेतील सततच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धेतील केलेली सुवर्ण पदक जिंकल्याची कामगिरी, त्यांचा जीवनपट, त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार व भारतरत्न पुरस्कार याबाबत सांगितले. त्यांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा त्यांच्या नावाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ध्यानचंद पुरस्कार हा दिला जात आहे. याबद्दल माहिती दिली.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी किमान एक खेळ खेळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपीक की. बी.निकम यांनी शिष्यवृत्ती बाबत माहिती, प्रा रुईदास बोबडे यांनी परीक्षा संबंधित आणि प्रा गणेश मोरे यांनी राष्ट्री सेवा योजना विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रचना राऊत यांनी केले तर आभार प्रा एकनाथ वाठोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्रशासकीय तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!