करिअरविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या बी. फार्मसीच्या विद्यार्थांचे यश

स्वामी इन्स्टिट्यूट फार्मसी महाविद्यालायाचे विद्यार्थी

भरत पाटील (कळवण तालुका प्रतिनिधी)

कळवण : येथील स्वामी इन्स्टिट्यूट फार्मसी महाविद्यालायाचा बी. फार्मसीचा निकाल ९८% लागला असून बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठातंर्गत परीक्षा घेण्यात आली होती. प्रणाली नेर (८.७३ एसजीपीए) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. ईश्वरी गाडगीळ व अंकिता देशमूख यांनी (८.५५ एसजीपीए) दितीय तर स्नेहा गोरे व पंकज पाटील यांनी (८.४५ एसजी पी ए) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष संजय गायकवाड, सचिव सौ . संगीता गायकवाड संचालक तेजस गायकवाड यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य किरण पाटील डॉ.सौरभ अग्रवाल, डॉ. प्रशांत चव्हाण व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!