

कळवण (प्रतिनिधी) : अभोणा येथील डॉ. विजय बिडकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे ‘कारगिल विजय दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. रवींद्र पगार यांचे ‘कारगिल विजय दिन महत्त्व’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआय चे प्राचार्य योगेश कुवर होते. याप्रसंगी डॉ.रवींद्र पगार यांनी सांगितले की, ‘कारगिल विजय दिवस हा भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. युद्धावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसकरांना देशाबाहेर हाकलून लावलं. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिल्ससह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरात साजरा केला जातो.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज अहिरे यांनी केले. आभार दिगंबर गावित यांनी मानले. कार्यक्रमासाठी कपिल पवार व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.




