

नाशिक : राज्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा देणारी वार्ता आहे. ज्या वाहनधारकांनी अजूनही आपल्या गाड्यांना हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवलेल्या नाहीत, त्यांच्यासाठी परिवहन विभागाने परत एकदा अंतिम मुदत वाढवून दिली आहे. वाहनधारकांना आपल्या वाहनावर नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. परिवहन विभागाने मुदत वाढवण्याची ही पाचवी वेळ आहे. या नंबर प्लेटमुळे अपघात किंवा गुन्हेगारीत सामील असलेल्या संबंधित वाहनांना सहज ओळखता येते. यामुळे सर्व वाहने सुरक्षित राहतील आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जाते.

ज्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट नाही, त्यांची कोणतीही कामे प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) होत नाहीत. वाहनमालकांना तातडीने HSRP बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापुढे कारण 31 डिसेंबरनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर मोठा दंड आकारला जाईल.





