महाराष्ट्रविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

सह्याद्री भटकंती करताना ‘पॅशन’ म्हणून फिरा – अतुल धामणकर

सह्याद्रीमित्र संमेलनात छायाचित्र प्रदर्शन उद्घाटन... वाघांच्या "स्लाईड शो"ने जिंकली नाशिकरांची मने

(अजित कुलकर्णी : विकासाची वाट प्रतिनिधी)

नाशिक : नाशिकमध्ये “स्वच्छ सह्याद्री – वणवा मुक्त सह्याद्री” हा यंदाचा संकल्प घेवून आणि डोंगर भटकंती करणाऱ्या राज्यातील गिर्यारोहकांसाठी भरविण्यात आलेल्या सह्याद्री मित्र संमेलनाला आज पासून कॉलेज रोड वरील गुरुदक्षिणा हॉल मध्ये सुरवात झाली असून आज सकाळी दहा वाजता एडवेंचर एक्स्प्रोचे उद्घाटन स्वागताध्यक्ष एड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले.तर अकरा वाजता नाशिक मधील छायाचित्रकार डॉ.मनोहर जाधव व प्रवीण अस्वले यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वन्यजीव छायाचित्रकार व वाघ अभ्यासक अतुल धामणकर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी वास्तुविशारद संजय पाटील,राधाकृष्ण गमे, भाजपा नेते व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी, किरण चव्हाण, प्रसाद पवार, कुणाल पाटील, संजय अमृतकर, भाजपा नाशिक शहर पर्यटन आघाडी प्रमुख नंदकुमार देसाई, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, दिलीप गिते आदी उपस्थित होते.

डॉ.मनोहर जाधव व प्रवीण अस्वले यांनी सह्याद्री मध्ये फिरून काढलेल्या शंभर छायाचित्रांचे प्रदर्शन हे रविवारी सायंकाळी दहा पर्यंत नाशिकरांना बघता येणार आहे. वाघ अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार अतुल धामणकर यांनी स्लाईड शो द्वारे नाशिकारांशी संवाद साधला.जंगलामध्ये फिरताना आलेले अनुभव शेअर करीत त्यांनी सह्याद्री भटकंती करताना ती ‘पॅशन’ म्हणून फिरा असा सल्ला यावेळी दिला.

नाशिक जवळून गेलेल्या सह्याद्री मध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून केवळ फोटो न काढता त्याचा अभ्यास करा,असेदेखील सांगितले.वाघांना नावे कशी दिली जातात, वाघ आणि मनुष्य संघर्ष यावर देखील त्यांनी आपले मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!