शंकर महाराजांवरील “अवलिया” चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा...

पुणे (वार्ताहर) : श्री क्षेत्र शंकर महाराज यांच्या आयुष्यावर आधारित “अवलिया” या चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरवात होते आहे.
जय शंकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली अवलिया चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून जिप्सी चित्रपटाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चंद्रकांत खंडारे पाहत आहेत. भाजपचे नेते आणि नगरसेवक राजेंद्र (आबा) शिलिमकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
श्री क्षेत्र शंकर महाराज 1800 व्या शतकापासून ते 1947 पर्यंत अध्यात्मिक शक्ती म्हणून जगभर कार्य केले. फक्त चमत्कार नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन लाभलेल्या श्री क्षेत्र शंकर महाराज यांच्यावर आधारित अवलिया या चित्रपटामुळे शंकर महाराजांचे महान विचार जगभर पोहचण्यासाठी मोठी सेवा यानिमित्ताने होणार आहे.
चित्रपटातील कलाकारांची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक शशिकांत खंदारे यांनी सांगितले. श्री क्षेत्र शंकर महाराज यांचा संपूर्ण जगात भक्तपरिवार आहे. अवलिया या चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच श्री क्षेत्र शंकर महाराजांची सेवा घडणार आहे.







