

(लेखक : शेखर तारे, सामाजिक कार्यकर्ते, नाशिक)
नाशिक रोड येथील कोठारी कन्या शाळेचे प्रयोगशाळा
सहाय्यक राजू मिश्रा यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने…!
शांत, संयमी आणि दिलखुलास स्वभाव व तशीच देहबोली असलेल्या राजू यांचं बोलणं इतकं गोड आहे की,एखादा अगदी कमालीचां हेकेखोर असणाऱ्या कुणीही व्यक्तीने त्यांचा संयमी असणे हा गुण आत्मसात केला पाहिजे. अगदी शत्रू गोटातील कुणीही व्यक्ती असली तरी त्यांना आपलेसे करून घेण्याच वकूब राजू राखून आहेत. उत्तरप्रदेशी ढगांची गोड भाषा कमालीची श्रवणीय वाटते. त्यांना कुठलंही काम सांगितलं असले, भले ते काम नाही झाले तरी हरकत नाही, पण त्यांनी त्या कामाला नकार दिलाय, असे आजपर्यंत ऐकिवात नाही.

उत्तर प्रदेशमधून नोकरी निमीत्ताने वडील कै.चंद्रबली मिश्रा हे ना.ए.सोसायटीच्या सेवेत होते.काही काळासाठी म्हणून हे कुटुंब इकडे स्थायिक झाले. भगूरच्या शाळेत बदली असताना त्यांच्या वडिलांनी जोड व्यवसाय म्हणून चाट भांडार सुरू केले होते. त्याला मदत करण्याचं काम तिघे भाऊ मिळून करत. संधी मिळताच राजूची देखील नियुक्ती संस्थेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून झाली. प्रामाणिक आणि सरळ साधा स्वभाव त्यासोबतचं शिक्षणाची आवड म्हणून ते सर्वांचे लाडके झाले. अनेक वेळा संस्थांच्या विविध शाळात त्यांची बदली झाली पण जिथ म्हणून बदलीने गेले तिथ तिथ उत्तम काम आणि लाघवी वृत्तीने सगळ्यांची मन जिंकली.

संस्थेत प्र.शाळा सहा.पद रिक्त झाल्यावर त्यांची नियुक्ती भगूरच्या शाळेत झाली.प्रारंभी प्रयोग शाळेच्या कामाची माहिती करून घेतल्यानंतरच्या काळात जिथजिथ त्यांनी सेवा केली तिथली प्रयोगशाळा सुसज्ज राहील याकडे विशेष लक्ष राहिले आहे.वेळच्या वेळी सर्व नोंदी व सोबतचे स्टॉक रजि. आणि असणारे साहित्य हे अद्यावत व अचूक असण्यात त्याचं मोठ श्रेय जाते. त्यांची ती जबाबदारी असली तरी त्यात चालढकल अथवा कंटाळा केला, असे नाही. मध्यंतरीच्या काळात काही वर्षापूर्वी वडिलांचे निधन, अलीकडेच आईचे निधन आणि अगदी चार महिन्यांपूर्वीच लहान पण कर्त्या मुलाचे अपघाती निधन ! हे प्रसंग खूप हृदयद्रावक असेच होते. त्यातही त्यांनी स्वतःला सावरत संपूर्ण कुटुंबाला धीर दिला.

ऑफिसमध्ये काम करीत असताना काही ठरावीक कार्यालयीन कामात तसेच बाहेरील कामातदेखील खूप मदत राहिली आहे. कौटुंबिक आघाडीत सुविद्य पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंड यांच्यासोबत ना.रोड येथे सुसज्ज घरात ते छान आयुष्य व्यतीत करत आहेत. हे करीत असताना बऱ्याचशा गोष्टी करायच्या राहिल्यात, हे गप्पांच्या नादात समजले. आता ते सेवानिवृत्त होत असल्याने सर्व इच्छित गोष्टींना मूर्त स्वरूप येईलच !




