सांस्कृतिक

साहेबराव नंदन आणि प्रदीप पगारे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, 8 जूनला नाशिकमध्ये वितरण

काळीज माझं साहित्य या साहित्य संस्थेतर्फे नाशिकमध्ये वितरण

छत्रपती संभाजीनगर (वार्ताहर) : येथील काळीज माझं साहित्य या साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारे जीवनगौरव पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. नाशिक येथील ज्येष्ठ कवी साहेबराव नंदन आणि छत्रपती संभाजी नगर येथील बालकवी, आदर्श शिक्षक प्रदीप पगारे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील “काळीज माझं साहित्य” या साहित्य संस्थेच्या नाशिक येथे ८ जुन २०२५ रोजी राज्यस्तरीय काव्यसंमेलनात विविध जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते साहेबराव नंदन आणि प्रदीप पगारे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत नुकतेच संस्थेचे निवडपत्र नंदन आणि पगारे प्राप्त झाले आहे.

ताहाराबाद येथील रहिवाशी आणि नाशिकमध्ये स्थायिक झालेले साहेबराव नंदन यांनी साहित्य क्षेत्रात आपले योगदान नियमितपणे सुरु ठेवलंय. गावापासून ते हौशी कलाकार म्हणून सहभाग देत राहिले. आजपर्यंत साहित्य सेवा देताना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

काळाच्या पडद्याआड गेलेली नंदन यांची नाटके आजही चर्चेचा विषय आहेत. दारूने झिंगला संसार भंगला, शनिचा फेरा, मेहंदी रंगली रक्ताची, कुंकवाचा करंडा आदी नाटकांमधून केलेल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.

साहेबराव नंदन यांच्या साहित्याला वेगवेगळ्या संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यात परिसस्पर्श चरित्र कादंबरी, गावगाडा काव्यसंग्रह, सगररत्न विशेषांक, सगर सेवार्थी अंक, स्नेहबंध विशेषांक, सगर दीपोत्सव दिवाळी अंक. कथा, लघुकथा, अहिराणी साहित्य आदींचा समावेश होतो. याशिवाय, नंदन यांच्या साहित्याला विविध स्पर्धांमध्ये सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील भूमिपूत्र, कवी तथा बालसाहित्यिक प्रदीप पगारे यांच्या ३० वर्षातील शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात येणार आहे. पगारे यांच्या दोन्ही पायांवर मोठी शस्त्रक्रिया झालेली आहे. अंथरुणाला खिळवून असतांनाही त्यांनी या काळात यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त दोन काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यापैकी ” बालमित्रांची छान छान गाणी” हा बालकाव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून ” लाल पाणी निळे रक्त” या काव्यसंग्रहाच्या लेखनाचे काम प्रगतीपथावर आहे.

आजारपणात त्यांचा १० प्रातिनिधिक काव्यसंग्रहात देखील कवितेचा सहभाग आहे. त्यात पाऊस, मधुगंध, क्रांतीज्योती, वारसा, येरे येरे ढगोबा( बालकाव्यसंग्रह), भीम जन्माची गाथा, रानफूल, वसंत ऋतू, आठवणीचा कोपरा व दर्पण या प्रातिनिधिक काव्यसंग्रहांचा समावेश आहे.

प्रदीप पगारे यांना यापूर्वी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचा आदर्थ शिक्षक पुरस्कार २०१४, लायन्स क्लब ऑफ औरंगाबादचा श्रेष्ठ गुरुजन पुरस्कार, विद्यार्थी सहायता संघ मुंबईचा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, मनुष्यबळ विकास अकादमीचा अष्टक्षेत्री गौरव पुरस्कार, अनिस कार्यगौरव राज्य पुरस्कार, मानव प्रबोधन अकादमीचा राज्य पुरस्कार, तसेच पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत आंतरराष्ट्रीय पुरस्कार या विविध पुरस्कारांनी यापूर्वी यांचा सन्मान झालेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!