उद्योग व व्यवसायकरिअरमहाराष्ट्रविशेषशहर

“फेमस ब्रँड अवॉर्ड 2025” नाशिकमधील एलोरा ईपीसी प्रा. लि. ला प्रदान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्योजक संजय नंदन यांनी स्वीकारला पुरस्कार

नाशिक (वार्ताहर) : प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय नंदन यांच्या एलोरा ग्रुपला नुकताच “फेमस ब्रँड अवॉर्ड 2025” प्रदान करण्यात आला. बांधकाम क्षेत्रातील एलोरा EPC प्रा. लि. ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नंदन यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अल्पावधीतच एलोरा ग्रुपने बांधकाम क्षेत्रात संपूर्ण जगात स्वतःची ओळख निर्माण केली.

याशिवाय, अन्यही क्षेत्रात आपला ठसा उमटवून भारतासह अन्य देशांमध्ये एलोरा ग्रुपने स्वतःची यंत्रणा उभी केली आहे. युवा उद्योजक मयूर नंदन यांनी अनेक प्रकल्पांना स्वतःच्या प्रयत्नांतून सातासमुद्रापार पोहचवले आहे. उद्योजक संजय नंदन आणि युवा उद्योजक मयूर नंदन यांनी उभ्या केलेल्या कार्याची दखल घेऊन अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकने एलोरा ग्रुपला मिळाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!