ज्येष्ठ नागरिकांसाठी शिवसुमन आनंदाश्रमामध्ये आहारात नाचणीच्या पदार्थांची उपलब्धता
आठवड्यातून तीन दिवस नाचणीपासून बनवलेले पदार्थ, नाशिकला निसर्गरम्य परिसरात आनंदाश्रमची उभारणी

नाशिक (वार्ताहर) : आयुष्याची सेकंड इनिंग पुढे नेत असताना वृद्धापकाळात आरोग्याची काळजी घेत ज्येष्ठ नागरिक आपली दिनचर्या सांभाळत असतात. मात्र वृद्धापकाळात सतावणाऱ्या व्याधींना तोंड देताना अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक वृद्धाची एक प्रकारची लढाईच सुरू असते.
वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नाशिकमध्ये जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमात आठवड्यातून तीन दिवस नाचणीपासून तयार करण्यात आलेले पदार्थ रोजच्या आहारात उपलब्ध करून देण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांची सोय झाली आहे.
नाशिकच्या गंगापूर येथील निसर्गरम्य परिसरात आधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या प्रशस्त घरांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत रोजच्या जेवणात आठवड्यात तीन दिवस नाचणीपासून तयार करण्यात आलेले सूप, उपीट, शिरा, ढोकळा, थालीपीठ, बिस्किटे, उत्तप्पा, नाचणीची भाकरी, इडली, नाचणीची खिशी आदींसह अन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ज्येष्ठ नागरिक आणि नाचणीचे महत्त्व
नाचणी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उत्कृष्ट अन्न आहे, कारण त्यात कॅल्शियम, लोह, आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हे घटक ज्येष्ठ नागरिकांच्या हाडांच्या आरोग्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पचनासाठी उपयुक्त ठरतात.
नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करते.
नाचणी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न आहे, जे हाडांचे आरोग्य सुधारते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, पचनक्रिया सुधारते, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवते.
अशी आहे शिवसुमन आनंदाश्रमातील व्यवस्था
नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेल्या प्रकल्पाची होतेय राज्यभर चर्चा… वृद्धापकाळाला आनंदी करणाऱ्या… अनोख्या प्रकल्पाची चर्चा होतेय सर्वत्र… वृद्धांना इथे कायमस्वरूपी व्यवस्था… अल्पोपहार… चहा… शाकाहारी भोजन… दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल… मनोरंजन… वृद्धांना कायमस्वरूपी सुंदर सोय… आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेली घरे, वाचनालय, प्रत्येक रूममध्ये टीव्ही, याशिवाय अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठी डॉक्टर्स, नर्सेस उपलब्ध… नाशिकच्या गंगापूर येथे… निसर्गाच्या सानिध्यात… * (7720030574, , 9657865966) फक्त वृद्धांच्या आनंदाचा विचार करून उभा राहिला अनोखा उपक्रम… ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आठवड्यातून तीन दिवस नाचणीपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची चव ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
:: विजयकुमार इंगळे, अध्यक्ष, जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम, मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर, नाशिक- 4222222.







