शैक्षणिक

डॉ. शाहिस्ता इनामदार यांची बीड येथील विधी महाविद्यालय प्राचार्यपदी निवड

नाशिक : येथील नवजीवन विधी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. शाहिस्ता सलीमखान इनामदार यांची मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बीड येथील स्वातंत्र्यसेनानी रामराव आवरगावकर विधी महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यपदी नेमणूक झाली आहे. नुकताच प्रभारी प्राचार्य डॉ. प्रमोद वाघमारे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. अमेरिका, रशिया, आफ्रिका या देशांत चर्चासत्रात रिसोर्स पर्सन म्हणूनही त्यांनी सहभाग घेतलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळुंके, सरचिटणीस माजी आ. सतीश चव्हाण, उपाध्यक्ष अमरसिंह पंडित, प्रा. सुधीर श्रीखंडे, माजी आ. राजेंद्र जगताप आदींनी स्वागत केले.

डॉ. इनामदार यांनी बी.एस.एल, एल.एल.एम, नेट, सेट, पीएच.डी. तसेच कायदा विषयातील अनेक पदव्या संपादन केलेल्या आहेत. यापूर्वी नाशिक येथील नवजीवन विधी महाविद्यालयात दोन वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून व पंधरा वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांचे पीएच. डी. फॅमिली लॉ या विषयात झाले आहे. त्या पीएच.डी. गाइडसुद्धा आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित झाले असून, आठपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. डॉ. शाहिस्ता यांची प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!