महिलाविकासाची वाट न्यूज विशेषसामाजिक

प्रतिकूल परिस्थितीतही चिमुकल्यांसाठी खंबीरपणे उभी राहिली मायमाऊली

अनिता पाटील (साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, नाशिक)

आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आई ची महती लिहून पूर्ण होणार नाही.
काय वर्णू महिमा आईचा,
झरा आहे वात्सल्येचा.

माझी आई शाळेत जाऊन शिकली नाही पण आयुष्यात आलेल्या प्रसंगांनी ती खुप काही शिकली आणि आम्हालाही शिकवले. शाळेच्या अभ्यासासोबत आईच्या संस्काराच्या शिकवणीची जोड मिळाल्यामुळे आम्ही छान घडलो.


परिस्थिती बेताचीच पण आमच्या घरून कोणीही उपाशी जात नसे. आम्ही लहान असतांना काही कारणास्तव आमच्या वडिलांची नोकरी गेली, त्यावेळी नातलग, परिचितांनी सल्ला दिला कि, गावा कडे जा इथे शहरात मुलांचे शिक्षण, पोट भरणे अवघड आहे, वडिलांनी पण निर्णय घेतला जाऊया गावाकडेच पण त्यावेळी आई ने हिम्मत दाखवली आणि लोकांची कामे करून ( नोकरी करण्या साठी शिक्षण नव्हते) आम्हा चार ही भावंडांचे शिक्षण सुरू ठेवून व्यवस्थित संगोपन केले.


शेतात मजुरीवर कामे करून संसाराचा गाडा ओढला. घरात आलेल्या पाहुण्या रावळ्यांना यथोचित पाहुणचार करण्याकडे तिचा कल असे, स्वतः ला एकवेळ खायला नाही मिळाले तरी चालेल पण समोरच्याला पोटभर खाऊ घातले म्हणजे आई चे पोट भरत असे. आज हि हे व्रत सुरूच आहे.


कधी कोणा पुढे हात पसरवायचे नाहीत, स्वाभिमानाने जगायचे, कोणाकडून फुकटचे खायचे नाही , आहे त्या परिस्थितीत आनंद कसा साजरा करायचा, प्रतिकूल परिस्थितीत डगमगून न जाता खंबीरपणे तोंड कसे द्यायचे हे धडे तिने आम्हाला दिले .
बदलत्या काळानुसार नातवंडाबरोबर आधुनिक तंत्रज्ञान शिकून जीवनाचा आनंद घेत आहे, पणतू सोबत पुन्हा बालपण जगत आहे.
सतत उत्साही, आनंदी कसे रहावे हे आई कडून शिकण्यासारखे आहे.


असे चालते बोलते विद्यापीठ आम्हाला लाभले म्हणून आम्ही छान घडलो आणि आमच्या मुलांना घडवीत आहोत.
अशा प्रेमळ, वात्सल्यमूर्ती, सुगरण आई स मी शतशः नमन करते.

📎
(माझी आई या सदरासाठी आपणही लेख पाठवू शकता… सोबत आपल्या आईच्या, परिवाराच्या आठवणीतील दोन तीन फोटोही लेखासोबत पाठवा. अवश्य प्रसिद्धी दिली जाईल.
📎लेख पाठवण्यासाठी व्हाट्सएप संपर्क क्रमांक : 7720030574

विजयकुमार इंगळे
संपादक
विकासाची वाट न्यूज, नाशिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!