सारडा कन्या शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

नाशिक – ना.ए सोसायटीच्या मा.रा.सारडा कन्या शाळेत नाशिक शहर व परिसरातील इयत्ता ४आणि ७ वी मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. यात बुद्धिमत्ता, गणित, मराठी, इंग्रजी या विषयांचे प्रश्न कसे सोडवायचे? त्यासाठी वापरायच्या सोप्या क्लुप्त्या यासाठी विवेक पाटील, हर्षल कोठावदे, संदीप शिनकर, अंजली कुलकर्णी, सुप्रिया देशपांडे, सारिका अहिरे, शितल चौधरी, दयावंती मते इ.शिक्षकांनी मार्गदर्शन केले.या वर्गात इ.चौथीच्या 135 तर इ.सातवीच्या 124 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थिनीची २९मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबिरासाठी शाळा समिती अध्यक्ष सरोजिनी तारापूरकर, मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, मुख्याध्यापिका मनीषा देशपांडे, पर्यवेक्षिका मृण्मयी खरवंडीकर शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.



