कुसुंबा येथील केशव स्मृती प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा तसेच सुकदेव नाना पगारे उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
अध्यक्षा पुष्पलता संभाजीराव पगारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

नितीन इंगळे (विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी धुळे)

धुळे : तालुक्यातील कुसुंबा येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय पिंपळनेर संचलित केशव स्मृती प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा तसेच, मुक्ताई पोस्ट बेसिक संलग्न कै. सुकदेव नाना पगारे उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा येथे वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता संभाजीराव पगारे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव स्वप्नील पगारे, संस्थेच्या उपाध्यक्षा छायाताई पगारे उपस्थित होते. कार्यक्रम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक ए . एल. शेवाळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक /प्राचार्य के. एस. गवळी यांच्या अधिपत्याखाली व मार्गदर्शनाने घेण्यात आला.


कार्यक्रमात स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बी. आर. अहिरे व के. सी. महाले यांनी संगीत युक्त पद्धतीने स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाची प्रस्तावना एम. डी. भामरे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. महिरे पी . बी. महिरे, एस. एन. पवार यांनी केले . कार्यक्रमात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर व कार्यावर आधारीत भाषण वक्तृत्व स्पर्धा, तसेच, कविता वाचन आणि गायन, स्वामी विवेकानंद यांच्या जागो इंडिया जागो मिशन अंतर्गत व्यसनमुक्ती गीत व नृत्यदृष्य, देशभकीपर गीतं व नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुष्पलता पगारे यांनी आपल्या भाषणात युवकांना ‘ विद्यार्थ्यांना “उठा, जागे व्हा शिका ‘ संघटीत व्हा ‘ आणि संघर्ष करा आणि आपले ध्येय प्राप्त करा .असा अनमोल संदेश दिला. कार्यक्रमाचे वृत्त संकलन व लेखन प्रा. के. व्ही. महाजन यांनी केले. आभार व समारोप सु. अ. अकलाडे यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक ‘ अधिक्षक ‘ अधिक्षिका ‘ शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.



