विकासाची वाट न्यूज विशेषसामाजिक

भंगारात सापडलेले तब्बल 10 लाखांचे सोने केले परत

शहादा येथील भंगार व्यावसायिक अमिन शेख यांच्या प्रामाणिकपणाचे होतेय सर्वत्र कौतुक

शहादा (वार्ताहर) – समाजाच्या प्रवाहात अनेकदा काही घटना नक्कीच माणुसकीचे दर्शन घडवून जात असतात. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात प्रामाणिकतेचे दर्शन घडवलेल्या प्रसंगाने चर्चा घडवून आणलीय.

सविस्तर वृत्त असे, खानदेशच्या शहादा तालुक्यातील भंगार व्यावसायिक अमीन शेख हे रोज आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी भंगार गोळा करण्याचे काम करतात. रोजचा दिनक्रम त्यांचा ठरलेलाच. मात्र शहादा शहरातील भंगार गोळा करणाऱया शेख यांना रद्दीत आलेल्या लाखो रुपये किमतीच्या दागिन्यांना त्यांनी परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवलंय.

अमीन शेख यांना शहरातील भंगार गोळा करत असतानाच रद्दीमध्ये दहा लाख रुपये किमतीचे सोने सापडले. भंगारात मिळालेले सोने संबंधित मालकाला परत केल्याने अमीन शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असतानाच शहादा येथील संबंधित शिक्षक परिवाराला परत मिळालेल्या सोन्यामुळे मोठी आर्थिक दुर्घटना टळली आहे.

राजपूत कुटुंबाला अश्रू अनावर

शहादा शहरातील विकास हायस्कूलच्या बाजूला वास्तव्यास असलेले संजय राजपूत यांच्याकडे अमीन शेख यांनी रद्दी घेतली… त्यानंतर शेख हे सर्व भंगार घेऊन घरी आले… कुटुंबातील सदस्यांसोबत भंगार वेगळे करताना त्यांना एका डब्यात दागिने आढळले. त्यानंतर शेख यांनी लगेचच माध्यमिक शिक्षक असलेल्या राजपूत कुटुंबातील सदस्यांसोबत संपर्क करून सर्व सोने परत केले. अमीन शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्व ठिकाणी कौतुक होत असतानाच सुमारे 10 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांचे भंगार होता होता वाचले… रद्दीत आपण दागिने घालून कसे ठेवले? याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!