सामाजिक

शंकर महाराजांच्या अंतापूर येथे बोकडबळी प्रथा बंदीचा ग्रामसभेत ठराव

तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन.

देवळा (प्रतिनिधी) : अंतापूर येथील श्री क्षेत्र शंकर महाराज आणि दावल मलिक बाबा यांची पावन भूमी असलेल्या ठिकाणी बोकडबळी प्रथा बंद करण्याबाबत प्रयत्न सुरू होते. दावल मलिक देवस्थान येथे दर गुरुवारी कंदुरीच्या कार्यक्रमात होणारी बोकडबळी प्रथा बंद करावी, असा ठराव अंतापूर ग्रामसभेने घेतला आहे. याबाबत प्रशासनाने सहकार्य करावे, असे निवेदन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी तहसीलदार कैलास चावडे यांना दिले.

अंतापूरला दर गुरुवारी होणाऱ्या कंदुरी कार्यक्रमात शेकडो बोकडांचा बळी जातो. या बोकडबळीमुळे उरलेले मांस, अवशेष गावात व देवस्थान परिसरात विखुरले जातात. यामुळे शंकर महाराज मंदिर, नयन महाराज समाधी, श्री स्वामी समर्थ मंदिर यांचे पावित्र्य भंग पावते. तसेच जेवणानंतर परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. कंदुरीच्या दिवशी हजारो वाहने येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी शेवरे शिवारातील शेतकऱ्यांना शेतीमालाची

ग्रामस्थांचा ठरावाला पाठिंबा

यापूर्वीही बोकडबळी बंदीचे प्रयत्न झाले होते. मात्र अंमलबजावणीच्या अभावामुळे बोकडबळी पुन्हा सुरू झाली. यावेळी मात्र ग्रामसभेने एकमुखी निर्णय घेतला असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी पुढील पावले उचलली जात आहेत. न्यायालयीन बाब उद्भवल्यास ग्रामसभा त्यास जबाबदार राहील. हे ध्यानात घेत ग्रामस्थांनीसुद्धा ठरावाला पाठिंबा दिला आहे.

– मदन खैरनार, उपसरपंच, अंतापूर

वाहतूक व मजुरांची ने-आण करण्यास अडचणी येतात. मागील काही गुरुवारपासून ताराबाद-मुल्हेर रस्त्यावर ४-५ तास वाहतूक कोंडी हाते. यामुळे ३५ गावांचा संपर्क तुटतो. याबाबत ग्रामपंचायतने २०१७ मध्ये ठराव करून बोकडबळी बंदीचा निर्णय घेतला होता.

अंतापूर वासियांतर्फे आवाहन…

पंचक्रोशीतील सर्व दावल मलुकदासांच्या भक्तांना कळविण्यात येते की अंतापुर गावामध्ये होत असलेली बोकड बळीची प्रथा ही बंद करण्यात येत आहे… तरीही अंतापुर गावी कंदूरी साठी येणाऱ्यांनी यापुढे अंतापुर गावात येऊ नये, ही विनंती…!

:: ग्रामपंचायत अतापूर आणि समस्थ अंतापूर ग्रामस्थ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!