
नितीन इंगळे : (विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी)



धुळे : तालुक्यातील कुसुंबा येथील प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा येथे राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य, आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबा यांच्या सहकार्याने कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम पाटील -माजी कृषी सभापती तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रितेश परदेशी – पंचायत समिती सदस्य, डॉ. नंदा पुरकर (S. M. O. W. H. O), डॉ. मनीष पाटील (T. H. O.), शेखर शिंदे (विस्तार अधिकारी), प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबा येथील अधिकारी व कर्मचारी डॉ. वैशाली परदेशी, डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी, डॉ. रुचिता पाटील, फकीर (वैद्यकीय अधिकारी), नारायण शिंदे (युवा शेतकरी मंच अध्यक्ष भाजप), बी.एम.तात्या (सेवानिवृत्त शिक्षक), सुनील शिंदे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शेवाळे, माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य गवळी यांनी मान्यवरांचा गुलाब पुष्प शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गोवर रूबेला लस देण्यात आली. डॉ. नंदा पुरकर यांनी या आजाराबद्दल माहिती दिली. तसेच, कुसुंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. परदेशी यांनी विद्यार्थ्यांना गोवर रूबेला लस घेण्यासाठी आवाहन केले. या आजाराची लक्षणे होणारे दुष्परिणाम व त्यापासून होणारे नुकसान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

सर्व निवासी विद्यार्थ्यांनी गोवर रूबेला लसीची माहिती घेऊन लस घेतली. लस घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना निरीक्षणासाठी एक तास एका खोलीत ठेवले. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी सर्वांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक महिरे पी. बी. यांनी केले. भामरे एम. डी. यांनी आभार मानले.



