चमत्कारास न भूलता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा
डॉ.ठकसेन गोराणे : मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिरात विज्ञानदिन साजरा



(अजित कुलकर्णी : प्रतिनिधी)
नाशिक : आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना चमत्कारास न भूलता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी.एस.गोराणे यांनी मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिरात विज्ञान दिनाच्या निमित्ताने केले. ते पुढे म्हणाले की, निरीक्षण, तर्कप्रचिती अनुमान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा आपल्या जीवनात उपयोग करा असे सांगून विद्यार्थिनींना वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व आणि विज्ञानाच्या मदतीने समाजातील चुकीच्या समजुती कशा दूर करता येतील यावर सखोल मार्गदर्शन केले.

विज्ञान हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून,प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा उपयोग कसा करावा,याचे उदाहरणांसह त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि भोंदूगिरी, हातचलाखी, फसवेगिरी यापासून सावध रहा, नेहमी वैज्ञनिक दृष्टिकोन जागरूक ठेवा असे असे आवाहन करून काही हातचलाखीचे प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी वर्गशिक्षिका अंजली कुलकर्णी व हर्षदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्यक्रम साजरा केला.

यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, उपमुख्याध्यापिका मनीषा देशपांडे, पर्यवेक्षिका मृण्मयी खरवंडीकर शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण, विज्ञान शिक्षिका सीमा खैरनार, अनिचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून विज्ञान गीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कु.रिद्धी जोरेकर,वैष्णवी थोरात यांनी सी.व्हि.रमण व विज्ञान विषयी भाषणे सादर केली. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेवर आधारित नाटिकेचे सादरीकरण केले. या प्रयोगांमधून विज्ञान कसे मनोरंजक आणि सोपे होऊ शकते, याचे प्रभावी दर्शन घडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी अपेक्षा वारुंगसे हिने तर अतिथींचा परिचय कु.मृदुला पासे हिने करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी रिद्धी मुठे तर आभार कु.आस्था घोलप हिने मानले. विद्यार्थिनींनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी विज्ञान प्रमुख हर्षदा दळवी, यांचेसह स्वाती जोशी, विदुला पंचाक्षरी, सारिका छत्रे, जयश्री पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रयोग सादरीकरण विद्यार्थिनींसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरले.


आपणही गोशाळेसाठी गायींना चारा दान करू शकता… आपण दिलेली मदत नक्कीच योग्य ठिकाणी दान असणार आहे. QR कोडचा वापर करून किंवा आपण स्वतःही भेट द्यावी… आपली मदत म्हणजे सामाजिक कार्याला बळकटी देणारी असेल.



