
बागबां… ओले आले… जुनं फर्निचर… यांसारख्या चित्रपटाच्या निमित्ताने समाजात ज्येष्ठ नागरिकांप्रती बदलत असलेला दृष्टीकोन वास्तव दाखवणारा ठरतोय… ज्या समाजासाठी, कुटुंबासाठी उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाच्या जोरावर कुटुंब घडवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला येणारं आयुष्य अनेक ठिकाणी दुःख देणारं ठरतंय. मात्र संस्कारक्षम विचारांची पिढी या जगातून नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जगात ज्येष्ठ नागरिक एक समस्या बनू पाहतेय, असे दाखवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होतो. मात्र येणाऱ्या काळातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतानाच त्यांचं आयुष्य आनंदी करणारा समाजोपयोगी प्रकल्प नाशिकच्या गंगापूर शिवारात आकाराला आलाय. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग म्हणता येईल…
ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य आनंदी करतानाच त्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचं मोलाचं काम नाशिकमध्ये होते आहे. गेल्या वर्षापूर्वी सुरू झालेला हा प्रकल्प अल्पावधीतच ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बनलाय. वर्षभरात हजारो ज्येष्ठ नागरिकांनी या प्रकल्पात सहभागी होत आयुष्य आनंदी करतानाच जगासमोर एक सारिपाठच ठेवलाय, नाशिकमधील पत्राशीत असलेल्या युवकाने एकत्र येत या प्रकल्पाची सुरूवात केली. प्रकल्प सुरू करण्याआधी गेली पाच वर्षे संपूर्ण राज्यातील वृद्धाश्रम, विरंगुळा केंद्र यांचे सर्वेक्षण करून मगच मुहूर्तमेढ रोवली गेली. एका दिवसाचा आनंद लुटण्यापासून ते या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी एका दिवसापासून ते कायमस्वरूपी राहण्याचीही सुंदर व्यवस्था उभी करण्यात आली आहे.
💦 आदर्श व्यवस्था
निवृत्तीनंतरवा काळ सुखात घालवतानाब प्रकृतीची काळजी घेत ज्येष्ठ नागरिक सेकंड इनिंग सुखकर करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करतात. मात्र आजच्या धकाधकीच्या युगात दोन पिढ्यांमधील अंतर वाढत गेल्याने अनेक ठिकाणी कौटुंबिक प्रश्नांनी डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत गंगापूर येथे सुरू झालेला जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब नक्कीच समाजाला नवी दिशा देणारा प्रकल्प ठरतोय. गेम्स, सिनेमागृह, करावके, भजन, संगीत रजनी, स्पर्धा, जुन्या काळातील विविध खेळ यांच्यासह निसर्गाच्या सानिध्यात वेगवेगळ्या सुविधांसह प्रशस्त वाचनालय, आरामाची व्यवस्था हे सर्व काही कल्पनेच्या पलिकडचे…
💦प्रसिद्धीपासून लांब
जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमच्या निमित्ताने येणाऱ्या काळात समाजाची गरज लक्षात घेवून सुरू झालेला हा प्रकल्प नक्कीच संपूर्ण जगामध्ये दिशादर्शक ठरणार आहे. वर्षपूर्ती होवूनही फारशी या प्रकल्पाबाबत कुठेही माहिती नाही, मात्र या ठिकाणी आनंद घेवून आलेले ज्येष्ठ नागरिकांचे क्लब, भजनी मंडळे, ज्येष्ठ नागरिकांचे विविध समुह याची माहिती इतरांना सांगत असतात, समाजात केवळ पैसा कमावण्याच्या उद्देशाने अनेक ठिकाणी वेगवेगळे फंडे वापरले जात असताना, गंगापूर येथील जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम याला अपवाद ठरलाय. केवळ आणि केवळ सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांसाठी संजीवनी ठरतोय.
काय आहे प्रकल्प?
💦ज्येष्ठ नागरिकांचा रोजच्या सिमेंटच्या जंगलातील एकटेपणा दूर करण्याच्या उद्देशाने जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमची उभारणी झालीय. संपूर्ण दिवसभर या प्रकल्पाच्या ठिकाणी सकाळी साडेनऊ ते सायं. ५.३० पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना नेण्याआणण्याची व्यवस्था या प्रकल्पाच्या व्यवस्थापनातर्फे केली जाते. प्रकल्पात जालेल्या ज्येष्ठ नागरिकांना सकाळी चहा नाश्ता, दुपारी शाकाराही भोजन आणि सायं. घराकडे परतताना पुन्हा चहा-नाश्त्याची व्यवस्था केली जाते. दिवसभराच्या नियोजनात ज्येष्ठ नागरिक आपले वय, दुःख विसरून वेथे जमलेल्या अन्य ज्येष्ठांसमवेत स्ममाण होतात. यात कसलाही बढेगाव, कमीपणा अथवा गरीब-श्रीमंत असा भेद नाही. फक्त आणि फक्त स्वतःचं आयुष्य आनंदी करण्यासाठी सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक दिवसभराच्या नियोजनात रमून जातात, हे सर्व अतिशय अल्पशा मोबदल्यात…
💦सत्पात्री दान…!
कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस, पुण्यस्मरण, सेवानिवृत्ती, पदोस्ती याशिवाय अन्य कारणांनी आपण समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. समाजाला दिशा देणाऱ्या ज्येष्ठांची पिढी आपल्यातून नष्ट होत असताना जव शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमच्या निमित्ताने एक पथदर्शी प्रकल्प नाशिकमध्ये उभा राहिलाय. आपण आपली मदत… सत्पात्री दान या ठिकाणी नक्कीच देताना मागेपुढे पाहू नका. केवळ आणि केवळ सामाजिक जपणूक या उद्देशाने उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाच्या निमित्ताने नक्कीच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार नाशिकच्या गंगापूर येथे उभा राहिला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य पुढे नेतानाच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखण्याचं काम नाशिकमधील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या एका युवकाने या प्रकल्पाच्या निमित्ताने उभं केलंय. आपली मदत नक्कीच या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. (८८८८९४७९७९, ७७२००३०५७४, ७७२१०८६७७८)
💦राहण्याची सुंदर व्यवस्था…
प्रकल्पात रोज एका दिवसासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबरच या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या प्रकल्पाला कुठेही वृद्धाश्रमाचे स्वरूप येवू न देता आनंद पेरणारा परिसर भक्कम करण्याची व्यवस्था था युवकाने केलीय जय शंकर विजयागण सीनिअर सिटीझन क्लबच्या आवारात भव्य श्री सद्गुरू शंकर महाराज यांची मूर्ती बसविण्यात आली असून शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची ज्येष्ठ नागरिकाना अभिमान वाटावा, अशी व्यवस्था नक्कीच उभी करण्यात आली आहे. ज्यांची मुले परदेशात आहेत, वयोमानानुसार नातेवाईकांकडे जाणे अशक्य असते, मात्र एकाच ठिकाणी राहून कंटाळवाणे आयुष्य झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा प्रकल्प नक्कीच संजीवनी देणारा ठरतोय २४ तास डॉक्टर, नर्सेस, केअरटेकरची उपलब्धता प्रशिक्षित कर्मचारी वर्गासोबतच या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली व्यवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरते आहे.
💦 कोणताही आर्थिक हेतू समोर न ठेवता उभा राहिलेला हा प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांसाठी संजीवनीच ठरतोय. आयुष्याच्या वाटचालीत मावळतीकडे झुकलेलं आयुष्य भक्कम करतानाच समाजाला दिशा देणारी एक पिढी जगातून नष्ट होत असतानाच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेल्या जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमच्या निमित्ताने नक्कीच नाशिकची ओळख सर्वदूर होण्यास फार वेळ लागणार नाही, हेही तितकेच महत्त्वाचे….!





