धार्मिकमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

गोपाळकाला व दहीहंडीचे उपक्रम उत्साहात साजरा

नाशिक : सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाखेतर्फे ayokn

नाशिक : येथील सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाला व दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त लहान गोविंदांनी दहीहंडीचा आनंद लुटला. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थी राधाकृष्ण, गोपगोपिकेच्या वेशभूषेत आले होते. त्यामुळे शाळेत अतिशय उत्साहाचे वातावरण होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण जन्माची गोष्ट छाया जाधव यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. भावना नागपुरे, क्रांती बोराटे यांनी गवळण सादर करत सोहळ्यात रंग भरला. उत्साहात न्हाऊन निघालेल्या गोपगोपिकांनी “आज गोकुळात रंग खेळतो हरी…. “गोविंदा आला रे आला “या गाण्यांवर ठेका धरला.

श्रीकृष्णाची भजने म्हणत दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरूडे, मनीषा जोशी, अश्विनी पगार, किशोरी शुक्ल, प्राजक्ता क्षीरसागर, उषा जोपळे, नीलिमा गायधनी,प्रतिभा बाविस्कर, राहुल चव्हाण, हर्षल कोठावदे, गणेश गांगोडे, निलेश चव्हाण, प्रशांत केंदळे, मनिषा कापसे, मंगला बनकर, मंजुषा झेंडे, स्वाती जोशी, सुषमा यादव, तेजश्री बुवा, दीपाली पाटील, सारिका सुयवंशी, कविता भामरे, जयश्री भडके आदींसह सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!