क्रीडाशहरशैक्षणिकसामाजिक

एसएनडी कृषी महाविद्यालयातर्फे अंदरसुलला जनजागृती मोहीम…

कृषीदिंडीसह वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन

जनार्दन धनगे (येवला प्रतिनिधी)

येवला : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, बाभुळगाव येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्न उपक्रमांतर्गत अंदरसुल येथे वृक्षरोपण करून कृषीदिंडी काढण्यात आली. यावेळी जय जवान… जय किसान… झाडे लावा… झाडे जगवा.. अशा घोषणा देत मोठ्या उत्साहात ढोल-ताशाच्या गजरात प्रभातफेरी पार पाडली.

कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सदस्य योगेश जहागीरदार आणि मुख्याध्यापक बेलदार यांनी कृषी दिन का साजरा करावा? तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सरपंच एकनाथ जानराव, उपसरपंच अमोल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश जागीरदार, कृषी सहाय्यक गोसावी, सहायक कृषी अधिकारी सोनवणे, सहाय्यक कृषी अधिकारी पाडेकर, सचिन पैठणकर, शिक्षक राठोड, कुमावत मॅडम, लांडगे मॅडम, पवार मॅडम,, देशमुख मॅडम यांचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले.

ग्रामस्थांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,कृषी अधिकारी आणि गावाला लाभलेले कृषीदूत सार्थक काळोखे, रोशन क्षिरसागर, दर्शन मुसळे, प्रशांत सहाणे, वैभव सूर्यवंशी, हर्षल खैरनार, ओम उंडे, ओंकार सोनवणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नम्र आवाहन, आपणही आपले 13 रुपये सत्पात्री दान आपल्या सोयीने वृद्धाश्रमाला देवू शकता…

नाशिक येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक उपक्रमाला नक्कीच आपले पाठबळ असू द्यात. समाजातील संस्कारांची पिढी जगातून नष्ट होवू पाहत असताना नाशिकच्या गंगापूर परिसरात सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास आपणही 13 रुपयांची मदत करू शकतात. आपल्याला स्वेच्छेने सामाजिक कार्यासाठी 13 रुपये दान करायचे असल्यास त्यांनी नक्कीच जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमला मदत करू शकता. आपली 13 रुपयांची मदत देण्यासाठी “क्यूआर क्रमांक” पुढीलप्रमाणे आहे. शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी, सातपूर, नाशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!