
🪡जगाला संस्कारांची सावली देणारी एक पिढी ज्येष्ठ नागरिकांच्या निमित्ताने आपल्यातून कमी होते आहे. आयुष्यात आलेल्या वाटचालीतील अडचणी, आव्हाने यांच्यावर मात करत या पिढीने समाज घडवतानाच एक अध्याय नव्या पिढीसमोर ठेवलाय. या पिढीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवतानाच त्यांच्या मनातील कल्पना लेखणीच्या माध्यमातून कागदावर उतरतानाच समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने लवकरच विकासाची वाट या पाक्षिकाच्या निमित्ताने समाजाच्या सेवेत येते आहे.
🪡ज्येष्ठांचे विचार, त्यांचे साहित्य, समाजप्रबोधन करणारे साहित्य, कथा, कविता, घडामोडी आदींचा समावेश असलेले पाक्षिक विकासाची वाट आपल्या सेवेत दाखल होते आहे.
🪡आपल्या सूचना, कल्पना, आपले साहित्य नक्कीच आमच्याकडे पाठवावे. त्याला नक्कीच यथावकाश प्रसिद्धी दिली जाईल. फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू होणाऱ्या या महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या उपक्रमाला आपली साथ अर्थात असणारच आहे. धन्यवाद… जय शंकर महाराज…
:: विजयकुमार इंगळे, संपादक
पाक्षिक “विकासाची वाट”
📞 8888947979



