आरोग्यविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनतर्फे आरोग्यवारी उपक्रमाचे आयोजन

नाशिकमधील अपेक्स वेलनेस हॉस्पिटलचे सहकार्य

डॉ. उज्ज्वला निकम (विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी)
नाशिक : आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिकमधील फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन व अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक” यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोग्यवारी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरातील फॅमिली फिजिशियन असोसिएशनच्या डॉक्टर सदस्यांनी वारकरी पोशाखात सहभाग नोंदविला.

कॅन्सरविषयीची जनजागृती, तंबाखूजन्य पदार्थ, व्यसन अशा विविध विषयाचे फलक हाती घेत, वारकरी वेशातील सर्व डॉक्टरांनी हॉटेल रामा हेरिटेज येथून कालिका मंदिरपर्यंत विठू नामाचा गजर करीत टाळ, मृदुंग ,पालखी, भजन, कीर्तन करीत प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेतला. कालिका मंदिर देवस्थानात ट्रस्टी डॉ प्रतापराव कोठावळे यांनी सपत्नीक दिंडीचे स्वागत केले.

दिंडीचे उभे रिंगण कालिका मंदिर पटांगणात पार पडले. तेथे फुगडी, लेझीम तसेच वारीतील पारंपारिक नृत्य यात सर्वांनी भाग घेतला. अपेक्स वेलनेस हॉस्पिटल चे संचालक डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. नितीन बोरसे, डॉ. नुतन बोंदार्डे, डॉ. प्रतिभा बोरसे, डॉ. अजिंक्य देसले व डॉ. देसले मॅडम, मार्केटिंग हेड श्री देवेन वाघ, तसेच फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन नाशिकच्या अध्यक्षा डॉ.शीतल सुरजुसे, सचिव डॉ. विजय मुंदडा, खजिनदार डॉ. अविनाश पवार, डॉ अविनाश बाविस्कर, डॉ दीपक चौधरी व डॉ. स्मिता कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन यासाठी लाभले.

डॉ. अजय भन्साळी यांनी धारण केलेले हुबेहूब विठ्ठलाचे रूप यावेळी मुख्य आकर्षण ठरले. डॉ. अजिंक्य देसले यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन कले. डॉक्टर्स डे चे औचित्य साधत अपेक्स वेलनेस हॉस्पिटल च्या वतीने सर्व उपस्थित डॉक्टरांना धन्वंतरीची प्रतिमा भेट देण्यात आली.


डॉ ज्योती पाटील, डॉ मनिषा मर्दा व संपूर्ण एफ.पी.ए.कार्यकारिणी तसेच अपेक्स वेलनेस हॉस्पिटल च्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. एफ.पी.ए.नाशिक चे माजी अध्यक्ष, सल्लागार समिती सदस्य व सस्थेचे सभासद मोठ्या संख्येत उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा… आपली जाहिरात अतिशय कमी दरात… जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी संधी… कमीत कमी दरात… Pamplet छापायची गरज नाही… थेट नागरिकांपर्यंत पोहचण्याचा सुंदर मार्ग म्हणजे विकासाची वाट न्यूज पोर्टलमध्ये कमी दरात दिलेली जाहिरात… नक्कीच एकदा अनुभव घ्या… फक्त 500 रुपयांत तीन दिवस आपली जाहिरात…

विजयकुमार इंगळे : संपादक : विकासाची वाट न्यूज : 8888947979, 7720030574

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!