आर्थिककरिअरकृषीमहाराष्ट्रमहिलाविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

ज्ञानेश्वरी जाधवची पोलिस दलात निवड

निफाड तालुक्यातील सावरगाव येथील कन्या

निफाड (प्रतिनिधी ) : तालुक्यातील सावरगाव येथील भारती व शिवाजी रामनाथ जाधव यांची कन्या कु. ज्ञानेश्वरी शिवाजी जाधव हिची मिरा-भाईंदर (ठाणे) येथे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदावर निवड झाली आहे. तिच्या या यशामागे गोविंद घंगाळे, सागर कातकाडे आणि वैभव थेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ज्ञानेश्वरीच्या या उल्लेखनीय यशामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये, नातेवाईकांमध्ये तसेच संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील एका तरुणीने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर मुलींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. ज्ञानेश्वरी जाधव हिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!