

नितीन इंगळे (विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी)
धुळे : पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून आज झाडे लावणे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाला ऑक्सीजनची गरज भासते, त्याचा अनुभव आपण सर्वांनी कोरोना काळात अनुभवला आहे. त्यामुळे वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम सातत्याने सुरु आहे. किमान एक तरी झाड लावावे, त्याची निगा राखावी आणि ते झाड मोठे होईपर्यंत त्याची जबाबदारी घ्यावी. हाच आपला खरा हरित वारसा ठरेल, असे प्रतिपादन शिक्षक सेनेचे मुरलीधर मोरे यांनी केले. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना -धुळे विभाग तसेच शिवसेना सोनगीर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणामास अभियानांतर्गत आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून अभिष्टचिंतननिमित्त प्रेरणामास अभियानांतर्गत दोन ठिकाणी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात तसेच जि.प. शाळा नंबर चारच्या प्रांगणात वृक्ष लागवडीचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी भारती भामरे तसेच सरपंच लखन ठेलारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना धुळे विभागाचे अध्यक्ष जगदीश बडगुजर ,सरचिटणीस अनिल चौधरी, कार्याध्यक्ष चंद्रकांत चौधरी, जिल्हा नेते पंडीत अण्णा पाटील, शिक्षक सेनेचे मुरलीधर मोरे, माजी उपसरपंच कैलास वाणी, शिवसेनेचे शहर प्रमुख अर्जुन मराठे , मा. प्रभारी सरपंच केदारेश्वर मोरे, शिवसेना ठाकरे गटाच्या ग्राहक कक्षाचे माजी उपजिल्हा प्रमुख दिनेश देवरे, आयुषचे वैद्यकीय अधिकारी डॉ किरणकुमार निकवाडे, डॉ. प्रफूल फूलपगारे, संजय परदेशी, पप्पु परदेशी, प्रमोद धनगर, सागर पटेल,
महेंद्र भोई , मुख्याध्यापक विजय पाटील, शिक्षक प्रभाकर पाटील, आनंदराव येलवे, आरती सोनवणे, सुपाबाई शिंदे, हर्षद गुजर,अनिल शिंपी, हिरालाल मोरे,आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मोरे पुढे म्हणाले की, मी शिक्षक म्हणून सेवानिवृत झालो असलो तरी माझ्या गावाची मराठी शाळा व मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी आज पासून जि. प. मराठी शाळा नंबर चार ही शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असुन मी वैयक्तिक लक्ष देवून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करून दाखवेल असे ही जाहीर केले. यानंतर गटशिक्षणाधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक तसेच उपस्थित मान्यवरांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.




