आरोग्यउद्योग व व्यवसायकरिअरमहाराष्ट्रमहिलाविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

जागतिक कर्करोग जनजागृती दिनानिमित्त रॅली, पथनाट्य

सातपूर येथील सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेजतर्फे आयोजन

सातपूर (प्रतिनिधी) : जागतिक कर्करोग जनजागृती दिनानिमित्त सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी नवीन नाशिक परिसरात कर्करोग आजाराविषयी विविध प्रबोधनात्मक फलकांद्वारे रॅली काढून तंबाखूला देऊ नका थारा, हाच कॅन्सर मुक्तीचा नारा अशा घोषणा देऊन जनजागृती केली व वाहतूक बेटांवर पथनाट्य सादर करून व्यसनांना घाला आळा, कर्करोग टाळा हा संदेश जनसामान्यांना देण्यात आला.


यावेळी महाविद्यालयाच्या प्रा. ऐश्वर्या कानतोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. प्रतीक शिंदे, प्रा. ललिता धुर्वे, प्रा. श्रद्धा पाटील आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!