कुसुंबा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
श्रीमती एन. एन. सी. महाविद्यालय, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन


(नितीन इंगळे विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी)
धुळे : तालुक्यातील कुसुंबा येथील सोशल अँड कल्चरल असोसिएशन संचलित श्रीमती एन. एन. सी. महाविद्यालय, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा. डॉ. दिपीका अनिल चौधरी (सचिव सो. क. अ. कुसुंबा, अधिसभा व विद्यापरिषद सदस्या, कबचौउमवि, जळगाव) यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनिल महादू चौधरी (अध्यक्ष सो. क. अ. कुसुंबा), प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. लोकेश चौधरी (उपाध्यक्ष सो. क. अ. कुसुंबा), मा. गणेश चौधरी (सदस्य सो. क. अ. कुसुंबा), डॉ. एम. जी. कासार (उपप्राचार्य व सदस्य सो. क. अ. कुसुंबा), संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सुनिल बाविस्कर, मुख्याध्यापक एस. डी. जाधव, सुरेंद्र परदेशी, गावातील माजी सैनिक व ग्रामस्थ्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालतील विद्यार्थ्यांच्या वतीने पथसंचलन, सामुहिक कवायत व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर साजरा करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल चौधरी यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांना अभिवादन करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. जी. ओ. चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि डॉ. कुणाल चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




