करिअरमहिलाविशेषशैक्षणिक

व्हिएटनामच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. मीना पवारांनी सादर केला संशोधन पेपर

अभोणा येथील डॉ. विजय बिडकर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका

प्रा. रवींद्र पगार (कळवण तालुका वार्ताहर)

कळवण (वार्ताहर) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डॉ. विजय बिडकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. मीना पवार यांनी टॉन ड्युक थांग युनिव्हर्सिटी होचीमिन्ह सिटी,व्हिएटनाम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या (12 ते 13 जून) स्पोर्ट सायन्स या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपला संशोधन पेपर सादर केला.

8 जून रोजी, इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड ॲनालिसिस यांच्यातर्फे आयोजित इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन योगामध्ये आणि 9 जून रोजी वर्ड सोसायटी फॉर पीस स्पोर्ट्स यांच्यातर्फे आयोजित हनोई, व्हिएटनाम वर्कशॉप ऑन स्पोर्ट्स फॉर पीस 2025 यामध्ये देखील सहभाग घेतला. या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातील संशोधन कार्यात तसेच जागतिक शांततेसाठी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. पवार यांना त्यांच्या मागील काही वर्षापासून करत असलेल्या क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या संशोधन कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड ॲनालिसिस या संस्थेतर्फे “इंटरनॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025” देण्यात आला.

या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये व्हिएटनाम, साऊथ ,कोरिया, चीन,थायलंड, जपान तसेच अनेक एशियन देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आपल्या देशाच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातील प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. यापूर्वी देखील डॉ पवार मीना निवृत्ती यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपले संशोधन पेपर सादर केलेले आहेत, तसेच त्यांंनी तीन पुस्तकेही प्रकाशित केलेली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत पेटंटदेखील तयार केलेले आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी व्हिएटनाम येथील टॉन ड्युक थांग युनिव्हर्सिटीचे स्पोर्ट सायन्स विभागाचे असोसिएट प्राध्यापक प्रो. डॉ त्रिनह ट्रग हिऊ, तसेच त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले. भारतीय विदयापीठातील प्राध्यापकांच्या चमुचे प्रतिनिधीत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप, डॉ. बप्पासाहेब मस्के यांनी केले.

या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेस जाण्यासाठी डांग सेवा मंडळाच्या सर्वेसर्वा सन्माननीय हेमलताताई बिडकर यांनी पुढाकार घेऊन त्याना सर्वतोपर्री मदत केली. तसेच प्रो. डॉ. एस के. मगरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ.मीना पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!