करिअरधार्मिकमहाराष्ट्रमहिलाविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिर शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

शाळा समिती अध्यक्ष सरोजिनी तारापूरकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

नाशिक – मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम कला शिक्षक अतुल भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली इ.8 व 9 वीच्या विद्यार्थिनींनी उत्साहात साजरा केला. प्रमुख पाहुणे विवेक पाटील आणि पर्यवेक्षिका मृण्मयी खरवंडीकर तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ या होत्या.यावेळी विशेष अतिथी म्हणून शाळा समिती अध्यक्ष सरोजिनी तारापूरकर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पल्लवी तिडके, शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण पर्यवेक्षिका मृण्मयी खरवंडीकर आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कु.प्रिया बनकर हिने केले.यानंतर विद्यार्थिनींनी शिवगीत सादर केले तर कु.अनुजा खैरनार,लावण्या पाटील, पारुल चौधरी,प्रिती निकम, माही घोडके, अवनी चव्हाण, समृध्दी भालेराव इ.नी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर कार्यकर्तृत्वावर भाषणे सादर केली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.कु.दिशा वाघ,राशी बोरसे,श्रावणी भदाणे,भक्ती जगताप यांनी विविध गीते सादर केली.प्रमुख पाहुणे विवेक पाटील यांनी शिवाजी महाराजांची ध्येय निश्चिती, नियोजनाचे महत्त्व, कल्पकता,स्त्री सन्मान लोकशाही, न्याय आणि अचूकता हे गुण आपण शिकू शकतो म्हणून आपण याचे अनुकरण करूया असा संदेश दिला.


मृण्मयी खरवंडीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगितला.अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनी शिवाजी महाराजांचे विविध पैलू उलगडून शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन कु.सौम्या वाघ आणि आभार कु.दिपश्री पवार हिने मानले.यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. कार्यक्रमास सर्व गुरुजन आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

आपणही गोशाळेसाठी गायींना चारा दान करू शकता… आपण दिलेली मदत नक्कीच योग्य ठिकाणी दान असणार आहे. QR कोडचा वापर करून किंवा आपण स्वतःही भेट द्यावी… आपली मदत म्हणजे सामाजिक कार्याला बळकटी देणारी असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!