छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिकतर्फे कार्यक्रम आयोजन


नाशिक : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक चे माजी कार्याध्यक्ष श्रीमंत बाळासाहेब कुलकर्णी व कार्याध्यक्ष अनिल देशपांडे ह्यांच्या हस्ते व वेदाचार्य रविंद्र पैठणे गुरुजी ह्यांनी केलेल्या मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अँड.सुहास भणगे ह्यांनी प्रास्ताविक केले व छत्रपती शिवाजी जयंती साजरी करण्याचे महत्त्व विशद केले. तर अनिल देशपांडे ह्यांनी त्या काळातील महाराजांचे कर्तृत्व विशद केले.


रविंद्र पैठणे गुरुजी ह्यांनी महाराजांचे युद्ध नेतृत्व गुण सांगितले. तसेचे बोकारे ह्यांनी महाराजा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले तर प्रा. लक्ष्मीकांत भट ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या वरील गीत गाऊन महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. त्याप्रसंगी डॉ. सचिन पाडेकर , उल्हास पंचाक्षरी , प्रदीप भानुवंशे , पांडुरंग सावजी , अजित कुलकर्णी , बोकारे बंधू व इतर सभासद उपस्थित होते.


आपणही गोशाळेसाठी गायींना चारा दान करू शकता… आपण दिलेली मदत नक्कीच योग्य ठिकाणी दान असणार आहे. QR कोडचा वापर करून किंवा आपण स्वतःही भेट द्यावी… आपली मदत म्हणजे सामाजिक कार्याला बळकटी देणारी असेल.




