आठवण : मायेचा झरा :
रजनी पाटील (अध्यक्षा, माँ जिजाऊ ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ, अमळनेर)


माय असता आनंदी माहेर,,
बाप असे तोपर्यंत हेरजार,,
भाऊ भावजाई बोलवती,,
माहेरची वाट लागे निराधार,,
जगात सुंदर स्त्री म्हणजे आई,,
अन जगातला श्रीमंत माणूस म्हणजे बाप,,
आई असे करुणेचा सागर,,
बाप तसा संस्काराचा आधार वड,,

प्रत्येक गाती आईची महती,,
बाप असता नसे कसलीच भीती,,
बाप गेला त्याची जागा झाली रीती,,
दोघे मिळूनी लेकरांच हित शोधती,,
असो सुख दुःखाचा डोंगर,,
आशीर्वादाने हलका वाटतोया भार,,
ऊबदार असा तो मायेचा पदर,,
तयावरी बाप मखमली रेशीम झालर,,

बाप कोसळणारा धबधबा,,
आईची माया संत संत धारा,,
बाप खळखळ समुद्र लाटा,,
आई समुद्रच्या त्या किनारा,,
विठूरखमई दोघे शोभे मंदिरी,,
आई माझी वात्सल मूर्ती,,
बाप असे सोनेरी कळस,,
मायबाप प्रेम निर्मळनिर्मळ,,
कवयित्री रजनी बी. पाटील या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या असून अमळनेर येथील माँ जिजाऊ ज्येष्ठ नागरिक महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतात.)


आमची किटी पार्टी… (आमचे मंडळ, आमचे नियोजन)
✍🏻सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून किटी पार्टीच्या किंवा महिला मंडळाच्या निमित्ताने सामाजिक चळवळ भक्कम करणाऱ्या आपल्या मंडळांची यशोगाथा नक्कीच पाठवा… सोबत मंडळातील महिलांचे, उपक्रमांची छायाचित्रे आवर्जून पाठवावीत. नक्कीच आपल्या मंडळांच्या उपक्रमाची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
📞7720030574 या व्हाट्सअप क्रमांकावर सविस्तर माहिती पाठवा.



