शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न
नाशिकच्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सहकार्य



नाशिक : येथील शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण संस्था आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोका हॉस्पिटलचे कान, नाक, घसा तज्ञ डॉ.पंकज भट व नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रियांका भट यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरात मोफत नेत्र व कान,नाक, घसा तपासणी करण्यात आली. सोबतच उंची, ब्लड प्रेशर, वजन, शुगर इत्यादी तपासण्या करून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला शिबिरार्थींना देण्यात आला. यावेळी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण संस्था नाशिक चे पदाधिकारी ॲड.भानुदास शौचे, चंद्रकांत महाजन, ॲड.सुहास भणगे, प्रमोद मुळे, प्रा.लक्ष्मीकांत भट यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी संस्थेचे सौ.राजश्री शौचे, ओमकार शौचे, राजन कुलकर्णी, प्रकाश शुक्ल सौ.रोहिणी कुलकर्णी, सौ.आसावरी भट, सौ. अनिता कुलकर्णी, सौ.शांता जाधव, गजानन जाधव माधुरी कुलकर्णी,निरज सहाय,लालबाबु शर्मा,संजय भुरे, प्रसाद देशपांडे, अरुण कुलकर्णी यांचेसह मोठ्या संख्येने शिबिरार्थी उपस्थित होते.





