करिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

मा.रा.सारडा कन्या शाळेत ग्रंथालय सप्ताहाचे उदघाटन

१७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आयोजन

नाशिक : येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित मा. रा. सारडा कन्या शाळेत येथे दि.११ ते नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित मा.रा.सारडा कन्या शाळेत येथे दि.११ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ग्रंथालय सप्ताह साजरा होत असून या सप्ताहाचे उदघाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांचे हस्ते आणि शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, उपमुख्याध्यापिका मनीषा देशपांडे,शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण,ग्रंथपाल अरविंद दिघे,ज्येष्ठ शिक्षक अतुल करंजे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष पल्लवी तिडके, जिल्हा ग्रंथालयातील अमोल जोशी आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथी सुनील जगताप वाचन संस्कृतीचा विकास करण्यासाठी सतत वाचन करा.सोशल मीडियापासून दूर राहून पुस्तकाशी मैत्री करा आणि आपल्या परिसरातील सार्वजनिक ग्रंथालयमध्ये जाऊन पुस्तके वाचा असे आवाहन केले.

ग्रंथालय सप्ताहातील स्पर्धांमध्ये भाग घ्या.असे सांगून शुभेच्छा दिल्या. सरोजिनी तारापूरकर यांनी विद्यार्थिनीची संवाद साधताना सांगितले की शालेय जीवनात पुस्तकांचे माध्यमातुन झालेले संस्कार भविष्यात कायम मार्गदर्शक ठरतात. म्हणून आत्ता पासून सर्व प्रकारचे पुस्तकांचे वाचन करा. भविष्यात मोठे व्हा.असे सांगून वाचन संस्कृती जोपसण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे सांगून कौतुक केले.आणि विविध स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनी केले त्यांनी वाचनाचे महत्व विशद करून विविध स्पर्धांमध्ये भाग घ्या असे सांगितले.
ग्रंथालय सप्ताहाचे निवेदन ग्रंथपाल अरविंद दिघे यांनी केले.या ग्रंथालय सप्ताहांत इ.५वी ते १०वी विद्यार्थिनींसाठी शब्दकोडे, बातमी कथालेखन,चित्रवर्णन, सामान्यज्ञान,सारडा स्कॉलर प्रश्नमंजुषा, म्हणीपूर्ती, चित्रवर्णन, श्रुतलेखन अनुवाद लेखन,निबंध,शुभेच्छा संदेश तयार करणे, पुस्तकांचे मुखपृष्ठ चित्रकला इ.स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचे दिघे यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व ग्रंथपुजनाने करण्यात आली.स्वागतगीत गीतमंच विद्यार्थिनी व ओंकार वैरागकर यांनी सादर केले.सूत्रसंचालन संगीता देशमाने यांनी तर आभार उपमुख्याध्यापिका मनिषा देशपांडे यांनी मानले.कार्यक्रमास विद्यार्थी,शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!