विशेषशहरशैक्षणिकसामाजिक

मुख्याध्यापक आर. ए. पाटील यांचा रविवारी सेवापूर्ती गौरव सोहळा

पारोळा येथील गजानन विद्यालयात 34 वर्षे सेवा : उपस्थितीचे आवाहन

जळगाव (वार्ताहर) : पारोळा तालुक्यातील देवगाव येथील कै. तात्यासाहेब रु. फ. पाटील शिक्षण मंडळ संचलित गजानन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. ए. पाटील यांच्या 34 वर्षे सेवपूर्तीनिमित्त गौरव सोहळ्याचे रविवार दि. २९ जून २०२५ रोजी पारोळा येथील कजगाव रस्त्यावरील कानबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.


पाटील यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चिमणराव पाटील असतील तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल पाटील, पारोळा येथील मा. नगराध्यक्षा नलिनीताई पाटील यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


मुख्याध्यापक आर. ए. पाटील यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सुदर्शना पाटील, निलेश पाटील, ज्ञानेश्री पाटील, ज्ञानेश पाटील, माधुरी पाटील, डॉ. पियुष पाटील, डॉ. ऋतुजा पाटील आणि परिवाराने कळवले आहे. सेवापूर्ती कार्यक्रमानंतर याच ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

📎
साहित्य पाठवा…
आपल्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील बातम्या, ललित लेख, सेवापूर्ती, बढती, प्रवासवर्णन, कविता, अनुभव, बालपण, प्रबोधनात्मक, शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य विषयांवर लिहू शकणाऱ्या वाचकांनी आपले साहित्य नक्कीच पुढील मोबाईल क्रमांकावर पाठवा... त्यास नक्कीच यथावकाश प्रसिद्धी दिली जाईल…
✍🏻
विजयकुमार इंगळे, संपादक
विकासाची वाट न्यूज
📞8888947979

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!