पिढ्या न पिढ्यांपासून सर्वांना अतिशय कमी खर्चात निरोप देणाऱ्या “पोस्ट कार्ड”चा इतिहास
चला जाणून घेऊया रंजक माहिती : "कुतुहल" या सदरात



टपाल कार्डची सुरुवात जगात पहिल्यांदा 1869 मध्ये ऑस्ट्रिया येथे झाली. जगातील पहिलं अधिकृत पोस्टकार्ड 1 ऑक्टोबर 1869 रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीमध्ये निघालं. त्याला “Correspondenz- Karte” म्हणत. डॉ. एमानुएल हेरमन यांनी कल्पना मांडली की लहान, लिफाफा नसलेल्या संदेशासाठी स्वस्त पर्याय हवा.
एकाच बाजूला पत्ता आणि दुसऱ्या बाजूला संदेश लिहायची मुभा होती. पत्रापेक्षा निम्मं पोस्टेज लागतं म्हणून ते लगेच लोकप्रिय झालं.

इतर देशांनी स्वीकारलं
1870-71 मध्ये जर्मनी, ब्रिटन, स्वित्झर्लंडने पोस्टकार्ड सुरू केले. 1870 च्या फ्रान्स-प्रशिया युद्धात सैनिकांनी मोठ्या प्रमाणात वापर केल्याने युरोपभर प्रसिद्धी मिळाली.
✒️
भारतामध्ये अशी झाली सुरुवात
ब्रिटिश सरकारने 1 जुलै 1879 रोजी भारतात पोस्टकार्ड सुरू केलं. किंमत होती ¼ आणा म्हणजे एक पैसा. सुरुवातीला फक्त सरकारी छापील कार्ड चालत. खाजगी चित्रपोस्टकार्ड 1899 पासून परवानगी मिळाली.
✒️
उतार आणि आजची स्थिती
1980 नंतर फोन आणि 2000 नंतर SMS, इंटरनेट, व्हॉट्सअॅपमुळे वापर खूप कमी झाला. तरी भारतीय पोस्ट आजही पोस्टकार्ड छापते.

(क्रमशः)





